लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली होती. कित्येक महिन्यापासून WTC फायनलची चर्चा सुरु होती. टीम इंडियाच्या फॅन्सना WTC फायनलकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. निदान 10 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ संपेल अशी अपेक्षा होती. पण असं घडलं नाही. पदरी पुन्हा एकदा निराशा आली. सलग दुसऱ्या WTC फायनलमध्ये खेळताना टीम इंडियाचा पराभव झाला.
याआधी न्यूझीलंडने WTC फायनलमध्ये टीम इंडियावर विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा होती. पण आता पुन्हा एकदा वनडे वर्ल्ड कप पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
विजेत्या टीमला किती रक्कम मिळाली?
ऑस्ट्रेलियाने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 209 धावांनी हरवलं. टीम इंडियाचं चॅम्पियन बनण्याच स्वप्न मोडलं. ऑस्ट्रेलियन टीम टेस्ट क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनलीय. फायनलमध्ये लज्जास्पद पराभवानंतरही टीम इंडियाला 6.5 कोटी रुपये मिळतील. चॅम्पियन बनलेल्या ऑस्ट्रेलियाला भारताच्या तुलनेत दुप्पट 13 कोटी रुपये मिळतील.
2021 मध्ये कुठल्या टीमला किती रक्कम मिळाली?
दक्षिण आफ्रिकेची टीम 2021मध्ये तिसऱ्या स्थानावर होती. त्यांना 4.50 लाख डॉलर म्हणजे 3 कोटी 72 लाख रुपये मिळाले होते. इंग्लंडची टीम चौथ्या स्थानावर होती. त्यांना 3.50 लाख डॉलर 2 कोटी 90 लाख रुपये मिळाले होते. श्रीलंकेची टीम पाचव्या स्थानावर होती. त्यांना 2 लाख डॉलर्स 1 कोटी 65 लाख रुपये मिळाले होते. अन्य टीम्सना प्रत्येकी 1 लाख डॉलर्स म्हणजे 82 लाख रुपये मिळाले होते.