World Cup 2023 | चांगली सुरुवात पण आता ढेपाळला, टीम इंडियाच वाढलं टेन्शन, WC दरम्यान अचानक काय झालं?

| Updated on: Nov 06, 2023 | 12:17 PM

World Cup 2023 | आता हळू-हळू त्याच्या परफॉर्मन्सचा ग्राफ घसरत चाललाय. निश्चित टीम इंडियासाठी चागंली बाब नाहीय. एक टीम म्हणून भारतीय संघाची कामगिरी जबरदस्त आहे. पण सेमीफायनलआधी एखाद-दुसऱ्या खेळाडूचा फॉर्म ढेपाळणं ही चांगली बाब नाहीय. टीम इंडियाने आतापर्यंत 8 पैकी 8 सामने जिंकेल आहेत.

World Cup 2023 | चांगली सुरुवात पण आता ढेपाळला, टीम इंडियाच वाढलं टेन्शन, WC दरम्यान अचानक काय झालं?
Follow us on

कोलकाता : भारतीय टीमने वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार सुरुवात केली होती. त्याच अंदाजात ते सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. सलग 8 मॅच जिंकून टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडिया आठवा सामना खेळली. या मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 243 धावांनी हरवलं. टीम इंडिया दमदार कामगिरी करत असताना एका खेळाडूचा फॉर्म टीमची चिंता वाढवतोय. या प्लेयरने वर्ल्ड कपमध्ये दमदार सुरुवात केली होती. पण आता त्याच्या परफॉर्मन्सचा ग्राफ घसरत चाललाय. वर्ल्ड कप सुरु असताना अचानक कामगिरीत घसरण कशी सुरु झाली?. केएल राहुलच्या फॉर्मने टीम इंडियाची चिंता वाढवलीय. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. त्या मॅचमध्ये 2 रन्सवर 3 विकेट गेले होते. त्यावेळी विराट कोहली आणि केएल राहुलने डाव संभाळला होता. राहुल त्या मॅचमध्ये 97 रन्सवर नाबाद होता. कोहलीने 85 धावा केल्या होत्या. चेन्नईच्या त्या मॅचपासून कोहली धावांचा पाऊस पाडतोय. पण राहुलच्या बॅटमधून धावा आटू लागल्या आहेत.

रविवार ईडन गार्डन्सवर टीम इंडियाची पहिली बॅटिंग होती. भारताचा डाव सुस्थितीत होता. त्यावेळी धावांचा वेग वाढवण्याची आवश्यकता होती. केएल राहुल क्रीजवर आला. त्याच्यासोबत कोहली होता. राहुलकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. टुर्नामेंटच्या सुरुवातीपासून त्याचा जो फॉर्म आहे, तो पाहता राहुलकडून अपेक्षा जास्त होत्या. पण असं झालं नाही. राहुल मात्र फेल ठरला. त्याने 17 चेंडूत फक्त 8 धावा केल्या. टीम इंडियाच यामुळे नुकसान झालं नाही. पण राहुलची ही स्थिती टीम इंडियाची चिंता वाढवणारी आहे. खासकरुन टुर्नामेंट अंतिम टप्प्यात असताना.

न्यूझीलंडच्या सामन्यापासून ग्राफ घसरला

राहुलची टुर्नामेंटच्या सुरुवातीला अशी स्थिती नव्हती. पहिल्या सामन्यात 97 धावा केल्यानंतर त्याने तोच फॉर्म कायम ठेवला. अफगाणिस्तान विरुद्ध त्याची बॅटिंगची संधी मिळाली नाही. पाकिस्तान विरुद्ध नाबाद 19 आणि बांग्लादेश विरुद्ध नाबाद 34 धावा केल्या. पण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्या परफॉर्मन्सचा ग्राफ घसरत गेला. न्यूझीलंड विरुद्ध 27, इंग्लंड विरुद्ध 39 आणि श्रीलंकेविरुद्ध फक्त 21 धावा केल्या.

आता सेमीफायनलमध्ये त्याच्याकडून अपेक्षा

इंग्लंड विरुद्ध केएल राहुल चांगली बॅटिंग करत होता. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला. श्रीलंकेविरुद्ध वेगाने धावा करताना तो बाद झाला. न्यूझीलंड विरुद्ध सुद्धा छोटी भागीदारी केल्यानंतर आऊट झाला. राहुलचा रोल टीममध्ये मिडिल ऑर्डरमध्ये टीमला स्थिरता देण्याशिवाय धावांचा वेग वाढवणं आहे. सेमीफायनलच्या महत्त्वाच्या सामन्यात राहुल आपला परफॉर्मन्स उंचावेल अशी अपेक्षा आहे.