PBKS vs LSG IPL 2023 : दुर्मिळ दुश्य ‘OMG Gautam Gambhir हसला’, मग काय? मीम्सवाले सुसाट

| Updated on: Apr 29, 2023 | 11:43 AM

PBKS vs LSG IPL 2023 : गौतम गंभीरच्या एका स्माइलमुळे नेटीझन्सच्या क्रिएटीव्हीटीला उधाण, पोट धरुन हसाल. गौतम गंभीर मैदानात असताना त्याच्या चेहऱ्यावर नेहमी गंभीर भाव असतात.

PBKS vs LSG IPL 2023 : दुर्मिळ दुश्य OMG Gautam Gambhir हसला, मग काय? मीम्सवाले सुसाट
gautam gambhr lsg ipl 2023
Image Credit source: twitter
Follow us on

मोहाली : पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये काल सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सने काल पंजाब किंग्सवर मोठा विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा दबदबा दिसून आला. लखनौच्या विजयात शान, वर्चस्व सगळ काही होतं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आनंदात दिसला. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये लखनौ सुपर जायंट्सची टीम दुसऱ्या स्थानावर आलीय. आयपीएल 2023 च्या सीजनमधील हा पाचवा विजय आहे.

लखनौने तब्बल 56 धावांनी पंजाब किंग्सवर विजय मिळवला. त्यामुळे त्यांचा नेट रनरेट चांगलाच वधारला. सहाजिकच एवढ्या मोठ्या विजयाचा टीम, कोच आणि मार्गदर्शक तिघांना आनंद होणं स्वाभाविक आहे.

हे सुद्धा वाचा

चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे

गौतम गंभीर मैदानात असताना त्याच्या चेहऱ्यावर नेहमी गंभीर भाव असतात. सामना जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे असतात. त्याची सोशल मीडियावर चर्चा होते. याच गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य असल्याच चित्र अभावाने आढळतं.


नेटीझन्सच्या क्रिएटीव्हीटीला बहर

काल पंजाब किंग्सला नमवल्यानंतर गौतम गंभीर हसला. सहाजिकच सोशल मीडियाने त्याची लगेच दखल घेतली. गौतम गंभीरचे हास्य मुद्रेतील वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सहाजिकच नेटीझन्सच्या क्रिएटीव्हीटीला देखील बहर आलाय. जिओ सिनेमाने गौतम गंभीर हसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. त्यावर नेटीझन्सच्या उडया पडतायत.


गौतम गंभीर कधी हसला?

पंजाब किंग्सचा विकेटकीपर बॅट्समन जितेश शर्मा (24) क्रीझवर होता. यश ठाकूरच्या गोलंदाजीवर त्याने हल्लाबोल केला होता. त्याच ठाकूरच्याच बॉलिंगवर केएल राहुलने मिडऑफला त्याची कॅच घेतली. जितेश शर्माच्या रुपाने पंजाबची सहावी विकेट गेली. जितेश शर्मा आऊट झाला. पण त्याआधी नऊ चेंडूत त्याने तीन सिक्स मारले होते. जितेश शर्मा बाद होताच गौतम गंभीर हसला.

केएल राहुलच्या लखनौ टीमने पहिली बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 257 धावा चोपल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा डाव 201 धावात आटोपला.