लंडन : इंग्लंड दौऱ्यावर असणारे भारतीय संघातील खेळाडू आपल्या पत्नी आणि मुलांसोबत त्याठिकाणी दिसून येत आहेत. तर ज्या खेळाडूंची अजून लग्न झालेली नाहीत ते आपल्या गर्लफ्रेंडसोबत मोकळा वेळ घालवताना दिसत आहेत. यातीलच एक जोडी म्हणजे केएल राहुल आणि आथिया शेट्टी. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजाना हैरान करणारा केएल राहुल त्याची कथित गर्लफ्रेंड आथिया शेट्टीसोबत इंग्लंडमध्ये आहे. कथित यासाठी कारण आथिया आणि राहुल यांनी अधिकृतरित्या त्यांच्या रिलेशनबद्दल काहीच सांगितलेले नाही, मात्र मागील बऱ्याच काळापासून ते एकमेंकासोबत आहेत. दरम्यान आथियाही बॉलीवुड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. त्यामुळे राहुलच्या लॉर्ड्समधील ऐतिहासिक शतकानंतर सर्वच त्याचे कौतुक करत असताना सुनिल शेट्टीच्या ट्विटचा मात्र नेटकऱ्यांनी त्यांना हवा तोच भारी अर्थ काढला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात राहुलने सलामीला येत अप्रतिम शतक झळकावलं आहे. राहुलच्या या शतकानंतर लॉर्ड्सवर शतक ठोकणारा तो नववा भारतीय बनला. ज्यामुळे सर्व देशभरातून त्याचं कौतुक होत आहे. अभिनेता सुनिल शेट्टीने देखील राहुलचे अभिनंदन करत ट्विट केलं. त्यात त्याने लिहिलं “क्रिकेटचा मक्का असणाऱ्या मैदानात शतक, भारी खेळलास बाबा.” या ट्वीटमध्ये सुनीलने प्रेमात केएल राहुलला बाबा म्हणून संबोधलं आहे.
100 at the Mecca of cricket! Well played baba ? @klrahul11 pic.twitter.com/jID3GKTm7y
— Suniel Shetty (@SunielVShetty) August 12, 2021
दरम्यान सुनिलची मुलगी आथिया आणि राहुल दोघेही एकमेकांसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या अनेक चर्चा असून त्यांच्या पोस्टमधून हे कायम दिसून येते. त्यामुळे सुनिलने राहुलचं अभिनंदन करताच नेटकऱ्यांनी सासऱ्याकडून जावयाचे अभिनंदन अशा प्रकारच्या कमेंट्सनी शेट्टीचा कमेंट बॉक्स भरुन टाकला.
Sir Rishta pakka samjhe….. ??
— Kundan Thakur (@KundanT31631101) August 13, 2021
@klrahul11 ne to sasur ji k sina chorra kar diya??#INDvENG #KLRahul pic.twitter.com/xNi2WCxPzA
— Pranav Jaiswal (@pranav_jais) August 13, 2021
हे ही वाचा
IND v ENG: ‘या’ कारणामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्विनला संधी नाही, विराटने स्वत: केला खुलासा
(After kl rahul smashes century at lords girlfriend athiya shettys father sunil shetty praise him with tweet)