Quinton de Kock: सेंच्युरियनचा पराभव जिव्हारी लागला, दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

| Updated on: Dec 31, 2021 | 1:47 AM

भारताने विजय मिळवलेल्या सेंच्युरियन कसोटीत डी कॉकची कामगिरी फार चांगली झाली नव्हती. त्याने पहिल्या डावात 34 आणि दुसऱ्या डावात 21 धावा केल्या होत्या.

Quinton de Kock: सेंच्युरियनचा पराभव जिव्हारी लागला, दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या खेळाडूची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती
Follow us on

डरबन: सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. डी कॉकने तडकाफडकी घेतलेला हा निर्णय अनेकांना चक्रावून टाकणार आहे. डी कॉक अवघ्या 29 वर्षांचा असून त्याने खूप लवकर क्रिकेटच्या एका मोठ्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी 38.83 च्या सरासरीने 54 कसोटी सामन्यात 3300 धावा केल्या आहेत. डी कॉकने सहा शतक आणि 22 अर्धशतक झळकावली आहेत. (After lost Against India in Centurion Quinton De Kock announced retirement from Test Cricket)

भारताने विजय मिळवलेल्या सेंच्युरियन कसोटीत डी कॉकची कामगिरी फार चांगली झाली नव्हती. त्याने पहिल्या डावात 34 आणि दुसऱ्या डावात 21 धावा केल्या होत्या. दोन्ही डावांमध्ये डी कॉक क्लीन बोल्ड झाला. खराब प्रदर्शनामुळे दक्षिण आफ्रिकन संघाला सेंच्युरियनमध्ये पहिल्यांदा आशियाई संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. या मैदानावरील दक्षिण आफ्रिकेचा दुसरा पराभव आहे.

डी कॉकने का निवृत्ती घेतली?
क्विंटन डी कॉक भारताविरुद्ध दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळणार नव्हता. डी कॉकची पत्नी साशा गर्भवती आहे. त्याने पितृत्वासाठी रजा घेतली होती. सेंच्युरियन टेस्ट संपल्यानंतर अचानक निवृत्ती जाहीर करुन डी कॉकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अवघ्या 29 वर्षाचा असलेला डी कॉक अजून सात-आठ वर्ष सहज कसोटी क्रिकेट खेळू शकला असता. पण त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेण्याचे कारणही सांगितले आहे.

हा निर्णय घेणं आपल्यासाठी खूप अवघड होतं. कसोटीमधुन निवृत्ती घेतली असली, तरी क्विंटन डी कॉक वनडे आणि टी-20 क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार आहे. त्याने निवृत्तीनंतर जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली आहे. “हा निर्णय माझ्यासाठी अजिबात सोपा नव्हता. मी माझ्या भविष्याबद्दल खूप विचार केला. आता माझी प्राथमिकता माझी पत्नी साशा आणि येणार माझं मुल आहे. माझ कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे. मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे” असे डी कॉकने त्याच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

कसं आहे डी कॉकचं टेस्ट करीअर
क्विंटन डी कॉकने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि वेस्टइंडिज सारख्या संघांविरुद्ध शानदार प्रदर्शन केलं आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीमध्ये शतक झळकावली आहेत. भारताविरुद्ध सात कसोटी सामन्यांमध्ये 20.14 च्या सरासरीने त्याला फक्त 282 धावा करता आल्या.

संबंधित बातम्या: 

U-19 Asia Cup 2021: टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेला भिडणार
IND VS SA: नेटमध्ये ते आम्हाला सहकारी समजत नाहीत, सामन्यानंतर केएल राहुलचं वक्तव्य
IND vs SA: VIDEO: जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत आफ्रिकन्सही हॉटेलमध्ये जोरदार नाचले

(After lost Against India in Centurion Quinton De Kock announced retirement from Test Cricket)