MI vs RR IPL 2023 : Tim David च्या कायरन पोलार्ड बरोबर होणाऱ्या तुलनेवर रोहित शर्मा म्हणाला….

| Updated on: May 01, 2023 | 9:11 AM

MI vs RR IPL 2023 : सामन्यानंतर रोहित शर्माने प्रेझेंटेशनमध्ये बोलताना मनाचा मोठेपणा दाखवला. त्याने प्रतिस्पर्धी टीममधील प्लेयरच तोंडभरुन कौतुक केलं. 'हा' मॅच विनर भारतीय क्रिकेटच भविष्य असल्याच रोहितने सांगितलं.

MI vs RR IPL 2023 : Tim David च्या कायरन पोलार्ड बरोबर होणाऱ्या तुलनेवर रोहित शर्मा म्हणाला....
IPL 2023 mumbai indians (1)
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली काल मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 6 विकेट राखून विजय मिळवला. आयपीएल 2023 मधील हा 42 वा सामना होता. वानखेडे स्टेडियमवर झालेली ही मॅच मुंबई इंडियन्सने लास्ट ओव्हरमध्ये जिंकली. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने एका प्लेयरच भरभरुन कौतुक केलं. पाचवेळा आयपीएलच विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने चालू सीजनमधील चौथा विजय मिळवलाय.

राजस्थान रॉयल्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 212 धावा ही डोंगराएवढी धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्सने 3 चेंडू आणि 4 विकेट राखून विजय मिळवला. टिम डेविडने लास्ट ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स मारुन मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. त्याने 14 चेंडूत 2 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 45 धावा केल्या.

डेविडच्या पोलार्ड बरोबर होणाऱ्या तुलनेवर रोहित शर्माच मत काय?

“आम्ही या अवघड लक्ष्याचा कसा पाठलाग केला, ते पाहून बरं वाटलं. मागच्या सामन्यात आम्ही अशाच लक्ष्याच्या जवळ पोहोचलो होतो. आमच्याकडे क्षमता आहे. आम्ही स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे” असं रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्माने, टिम डेविड आणि कायरन पोलार्डची तुलना होते, त्यावर सुद्धा उत्तर दिलं. “पोलार्ड मोठा खेळाडू असून टिम डेविडकडे अजून वेळ आहे. इतक्या वर्षात पोलार्डने इतक्या साऱ्या चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला. टिम डेविडकडे क्षमता आणि ताकत आहे” असं रोहित शर्माने सांगितलं.

रोहित शर्माकडून दोघांच कौतुक

सूर्यकुमार यादव पुनरागमन करेल, हा आम्हाला विश्वास होता, असं रोहित शर्मा म्हणाला. यशस्वी जैस्वालच सुद्धा रोहित शर्माने कौतुक केलं. “यशस्वी जैस्वालला मागच्यावर्षी मी पाहिलं होतं. यावर्षी तो आपल्या खेळाला एका नव्या उंचीवर घेऊन गेलाय. मी त्याला विचारलं, इतकी ताकत कुठून आली? त्यावर त्याने जीममध्ये वेळ घालवत असल्याच उत्तर दिलं. भारतीय क्रिकेट आणि राजस्थान रॉयल्स दोघांसाठी ही चांगली बाब आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.