पाकिस्तान क्रिकेटवर आणखी एक नामुष्की, आधी मालिका रद्द, मग चूकीचं इंग्रजी लिहीत लाज आणली

| Updated on: Sep 17, 2021 | 9:04 PM

पाकिस्तानच्या भूमीत तब्बल 18 वर्षानंतर न्यूझीलंडचा संघ क्रिकेट मालिका खेळण्यासाठी आला होता. पण पहिलाच एकदिवसीय सामना सुरु होण्यापूर्वीच संपूर्ण मालिका रद्द करण्यात आली आहे.

पाकिस्तान क्रिकेटवर आणखी एक नामुष्की, आधी मालिका रद्द, मग चूकीचं इंग्रजी लिहीत लाज आणली
Follow us on

कराची : न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात क्रिकेट सामन्यांच्या दौऱ्यासाठी गेला होता. या दौऱ्यात 3 वनडे आणि 5 टी-ट्वेंटी सामने खेळवण्यात येणार होते. वनडे सीरिजने या दौऱ्याला सुरुवात होणार होती. त्यातील पहिला वनडे सामना आज (17 सप्टेंबर) खेळवण्यात येणार होता. मात्र, पहिल्याच सामन्याच्या टॉस होण्याच्या 20 मिनिटांआधीच हा सामना रद्द करण्यात आला. सुरक्षेच्या कारणास्तव हा सामना रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुन्हा एक मोठा झटका बसला. सोबतच त्यांनी न्यूझीलंडच्या मालिका रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल ट्विट करताना लिहिलेल्या इंग्रजीतही चूक केल्याने त्यांच्यावर आणखीच नामुष्की ओढवली आहे.

2009 साली लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय संघानी पाकिस्तानचा दौरा करणं सोडून दिलं. पण मागील काही वर्षांमध्ये यात बदल होत असून काही संघ पुन्हा पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. नुकतेच दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघानी पाकिस्तानचा दौरा केला. त्यानंतर आता न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान दौऱ्यावर आला होता पण न्यूझीलंडमधील सुरक्षा यंत्रणांनी संघाला सामना खेळण्यासाठी न जाण्याच्या सूचना देत सतर्क केले. ज्यानंतर संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला. या निर्णयानंतर पाकिस्तानात दौऱ्यासाठी संपूर्ण प्रकारच्या सोयी केल्या असल्याचे सांगताना पाकिस्तानने ट्विटमध्ये संपूर्ण सुरक्षा हे इंग्रंजीत लिहितीला Full Proof च्या जागी Fool Proof असं लिहिलं होतं. त्यामुळे Full आणि Fool या शब्दाच्या घोळ झाल्याने नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. चूक कळताच हे ट्विट डिलीट केलं असलं तरी त्याचे स्क्रिनशॉट अनेकांनी घेतले आहेत.

हेच ते ट्विट

इंग्लंडच्या दौऱ्यावरही टांगती तलवार

कीवी संघाने शेवटच्या मिनिटात सामना रद्द केल्याने  इतर मालिकांवरही याचा परिणाम होऊ शकतो. न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर पाकिस्तानात इंग्लंडच्या महिला आणि पुरुष संघ दौऱ्यासाठी येणार होते. तब्बल 16 वर्षानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानात दौऱ्यासाठी तयार झाला होता.  टी20 विश्वचषकाआधी हा दौरा ठेवण्यात आला होता. पण आता या घटनेनंतर या दौऱ्यावरही रद्द होण्याची टांगती तलवार लटकत आहे. पुरुष आणि महिला संघ 2-2 टी-20 सामने खेळणार असून महिला 3 वनडे सामनेही खेळणार होते.

ऑस्ट्रेलियाचा दौराही धोक्यात

न्यूझीलंड दौरा रद्द झाल्याने इंग्लंडच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मागील बराच काळापासून आशा असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं भविष्यही धोक्यात आलं आहे.  या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी20 अशा सर्व प्रकारचे सामने खेळवण्यात येणार होते. ही मालिका फेब्रुवारी, मार्च 2022 दरम्यान खेळवली जाणार होती. ऑस्ट्रेलिया संघ जवळपास  24 वर्षांपासून पाकिस्तान दौऱ्यावर गेलेली नाही.

हे ही वाचा

PAK vs NZ: रावळपिंडीमध्ये होऊ घातलेल्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला आधी विलंब, मग संपूर्ण दौराच रद्द!

PAK vs NZ: न्यूझीलंडचा दौरा रद्द होताच पाकिस्तान क्रिकेटला मोठा झटका, ‘हे’ देशही दौरा रद्द करण्याच्या मार्गावर

पाकिस्तानची नाचक्की! टॉसच्या अर्धा तास आधी न्यूझीलंडकडून सा्मना रद्द, पाकिस्तानविरोधात न खेळातच तातडीनं मायदेशी परतणार, नेमकं कारण काय?

(After New zealand series cancelled Pakistan tweeted wrong English)