ODI World Cup 2023 नंतर टीम इंडिया फुल बिझी, ‘या’ देशांविरुद्ध खेळणार सीरीज

| Updated on: Jul 03, 2023 | 3:34 PM

ODI World Cup 2023 संपल्यानंतर टीम इंडियाचा कार्यक्रम खूपच व्यस्त असेल. टीम इंडियाच पुढच मिशन T20 वर्ल्ड कप असेल. त्यासाठी टीम इंडिया या देशांविरुद्ध सीरीज खेळणार आहे.

ODI World Cup 2023 नंतर टीम इंडिया फुल बिझी, या देशांविरुद्ध खेळणार सीरीज
Team India
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला फुरसत घ्यायला वेळ नसेल. वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया टेस्ट आणि T20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून मिशन T20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिकेवरुन परतल्यानंतर मायदेशात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच T20 सामन्यांची सीरीज होईल.

वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशात पाच T20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारतात कसोटी मालिका खेळण्याासाठी येईल. त्यानंतर बांग्लादेशची टीम दोन आणि न्यूझीलंडची टीम तीन कसोटी सामने भारतात खेळणार आहे.

पुढचा T20 वर्ल्ड कप कधी?

वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटवर आपलं लक्ष केंद्रीत करेल. हार्दिक पांड्या T20 मध्ये टीम इंडियाच नेतृत्व करतो. पुढचा T20 वर्ल्ड कप अमेरिकेत होणार आहे.

टीम इंडियाला फुरसत नसेल

सध्या टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाली आहे. तिथे ते वेस्ट इंडिजचा सामना करणार आहेत. आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कप लक्षात घेता टीम इंडियासाठी हा दौरा महत्वाचा आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडियाला फुरसत नसेल. टीम इंडिया आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असेल.

कशा आहेत टीम इंडियाच्या मालिका?

T20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी पुढत्या मालिका महत्वाच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला जाण्याआधी टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 3 टी 20 सामन्यांची सीरीज खेळेल. पुढच्यावर्षाच्या सुरुवातील इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येईल. दोन्ही टीममध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका होईल. त्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाईल.

दोघांबद्दल निर्णय घ्यावा लागेल?

श्रीलंकेचा दौरा झाल्यानंतर टीम इंडिया बांग्लादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध मालिकेवर लक्ष केंद्रीत करेल. पुढच्यावर्षी या मालिका होणार आहेत. या सर्व मालिकांआधी बीसीसीआयला काही निर्णय घ्यावे लागतील. हार्दिक पांड्याला T20 मध्ये नव्याने संघ बांधायचा आहे. टीममधील वरिष्ठ खेळाडू म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल.

वर्ल्ड कप नंतर असं असेल टीम इंडियाच शेड्युल

डिसेंबर – टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान 3 T20

डिसेंबर-जानेवारी – टीम इंडिया दक्षिण आफ्रिका सीरीज (2 टेस्ट, 3 वनडे आणि 3 T20)

जानेवारी-मार्च – 2024 मध्ये इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर (5 टेस्ट)

जुलै – टीम इंडिया श्रीलंका दौरा 2024 (3 वनडे. 3 T20)

सप्टेंबर-ऑक्टोबर – बांग्लादेश भारत दौरा 2024 (2 टेस्ट, 3 T20)

ऑक्टोबर-नोव्हेंबर – न्यूझीलंड भारत दौरा 2024 (3 टेस्ट)