Asia cup 2023 Final | टीम इंडियाच यश पाहून शाहीद आफ्रिदीचा बाबर आजमला बोचणारा प्रश्न

| Updated on: Sep 16, 2023 | 1:40 PM

Asia cup 2023 Final | शाहीद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेटला एक बोचणारा प्रश्न केलाय. आशिया कप 2023 टुर्नामेंटमध्ये पाकिस्तानने खूपच खराब प्रदर्शन केलय. टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही टीमकडून पाकिस्तानचा पराभव झाला.

Asia cup 2023 Final | टीम इंडियाच यश पाहून शाहीद आफ्रिदीचा बाबर आजमला बोचणारा प्रश्न
Shahid Afridi-Babar Azam
Image Credit source: twitter
Follow us on

लाहोर : आशिया कप टुर्नामेंटच्या फायनलमध्ये खेळण्याची पाकिस्तानची संधी हुकली. आधी टीम इंडियाने नंतर मस्ट वीन मॅचमध्ये श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानवर विजय मिळवला. टीम इंडियाने, तर पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानला अजिबातच संधी दिली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात नसीम शाह आणि हॅरिस रौफ हे दोन प्रमुख गोलंदाज खेळत नव्हते. पाकिस्तानचे हे दोन्ही गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत. नसीन शाहची दुखापत गंभीर आहे. नसीम शाह, तर वर्ल्ड कप 2023 मध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपच्या तोंडावर शादाब खानच्या खराब प्रदर्शनाने पाकिस्तानची चिंता वाढवली आहे. 24 वर्षाच्या शादाबने टुर्नामेंटमध्ये चांगली सुरुवात केली होती. नेपाळ विरुद्ध सलामीच्या सामन्यात 4 विकेट काढले. त्यानंतर त्याची कामगिरी घसरली. सुपर 4 स्टेजमध्ये श्रीलंका आणि टीम इंडिया विरुद्ध त्याने फक्त 2 विकेट काढले.

पाकिस्तानच्या या प्रदर्शनावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीने प्रश्नचिन्ह निर्माण केलय. पाकिस्तानच्या टीम सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना टीम इंडियाचे दाखले दिले आहेत. बाबर आजम आणि पाकिस्तान टीम मॅनेजमेंट कशाप्रकारे बॅकअप प्लेयरचा वापर करत नाहीय, असा आफ्रिदीचा मुद्दा आहे. “हा जुना प्रॉब्लेम आहे. भारताची टीम आशिया कपमध्ये खेळतेय. प्रत्येक सामन्यात त्यांच्या टीममध्ये मी बदल बघितले आहेत. त्यांनी सिनियर खेळाडूंना विश्रांती देऊन ज्यूनियर प्लेयरना खेळवलं. ते वर्ल्ड कपसाठी तयारी करतायत हे त्यातून दिसतं. हे निर्णय खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही 15 सदस्यीय स्क्वाड निवडलं. बेंचवर बसणारे खेळाडू सुद्धा प्लेइंग 11 मधल्या प्लेयर इतकेच उत्तम आहेत” असं आफ्रिदी म्हणाला.

‘तुम्ही त्याला विश्रांती दिली पाहिजे’

“शादाबला विश्रांती दिली, तर ओसामा मीर आहे. याआधी पाकिस्तानसाठी ओसामा मीरने चांगली कामगिरी केलीय. एखादा खेळाडू काही सामन्यात चांगलं प्रदर्शन करत नसेल, तर तुम्ही त्याला विश्रांती दिली पाहिजे. त्याला 15 सदस्यीय टीममधून वगळा असं मी म्हणत नाहीय. पण तुम्ही त्याला टीममध्ये ठेवून विश्रांती देऊ शकता. हेड कोच आणि बॉलिंग कोच बरोबर त्याला वेळ घालवू द्या. मला खरच समजत नाहीय की, तुमचे प्लान्स काय आहेत?” अस आफ्रिदी म्हणाला.