मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup) आता अवघ्या महिन्याभरावर य़ेऊन ठेपला आहे. आय़सीसीची सर्वात रंगतदार स्पर्धा असणाऱ्या या चषकात पाठवण्यासाठी भारताने आपले अंतिम 15 शिलेदार आणि 3 राखीव खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. बीसीसीआयने बुधवारी 8 सप्टेंबर रोजी ही नावं जाहीर केली. यामध्ये बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यातीलत दोन नावं म्हणजे मुंबई इंडियन्स संघाचे युवा खेळाडू इशान किशन (Ishan Kishan) आणि राहुल चाहर (Rahul chahar). विशेष म्हणजे चा दोघांनाही दोन दिग्गज खेळाडूंच्या जागी संघात स्थान मिळालं आहे. यामध्ये इशानला शिखर धवन (Shikhar Dhawan) तर राहुलला युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) याच्या जागी स्थान मिळालं आहे.
संघात स्थान मिळताच इशान आणि राहुल यांना अत्यनंद झाला. साहजिकच त्यांच्या जागी कोणीही असतं तरी असाचं आनंद झाला असता. कारण कोणत्याही खेळाडूला विश्वचषकात देशाचं प्रतिनिधीत्त्व करायला मिळणं याहून मोठी गोष्ट कोणतीच नाही. सध्या दोघेही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यासोबत आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठी युएईत आहेत. त्या ठिकाणाहून मुंबई इंडियन्स संघाने दोघांचे संघात स्थान मिळाल्यानंतर आनंद झालयाचे व्हिडीओ शेअर केल आहेत.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर
हे ही वाचा :
T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण
T20 world Cup 2021: विराट कोहलीचे 2 एक्के, तरीही टीम इंडियात स्थान नाहीच!
(After selected for t20 world cups indian team ishan kishan and rahul chahar seems so happy see video)