IND vs AUS Final | पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये काय स्थिती होती? राहुल द्रविड काय म्हणाले?

| Updated on: Nov 20, 2023 | 9:24 AM

IND vs AUS Final | टीम इंडियाचा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केला. या वर्ल्ड कप बरोबरच राहुल द्रविड यांच्यासोबतचा कोच म्हणून बीसीसीआयचा करार संपुष्टात आला आहे. आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या कोचपदी कायम राहणार का? त्यांना मुदतवाढ मिळेल का? हा सुद्धा एक प्रश्न आहे.

IND vs AUS Final | पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये काय स्थिती होती? राहुल द्रविड काय म्हणाले?
Rahul Dravid
Follow us on

IND vs AUS Final | ICC वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये पुन्हा एकदा टीम इंडिया आणि लाखो चाहत्यांच्या पदरी निराशा आली. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकली. या वर्ल्ड कप बरोबरच राहुल द्रविड यांच कोच म्हणून बीसीसीआयसोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. वर्ल्ड कपमधील टीम इंडियाची कामगिरी पाहता राहुल द्रविड यांच्यासोबतच्या कराराच नूतनीकरण होण्याची शक्यता आहे. मॅच संपल्यानंतर राहुल द्रविड पत्रकार परिषदेला सामोरे गेले. त्यावेळी त्यांना या संबंधी प्रश्न विचारला. ते एवढच म्हणाले की, ‘मी या बद्दल अजून विचार केलेला नाहीय’ कोचपदी कायम राहणार का ? या प्रश्नावर राहुल द्रविड म्हणाले की, “मी या बद्दल अजून विचार केलेला नाही. सामना संपल्यानंतर मी जस्ट इथे आलोय. माझ्याकडे याबद्दल विचार करायला तसेच व्यक्त व्हायला वेळ नाहीय”

“मला वेळ मिळेल, तेव्हा मी नक्कीच याबद्दल विचार करेन. सध्या माझ्या डोक्यात फक्त वर्ल्ड कपचा विचार होता. माझ सर्व लक्ष वर्ल्ड कपवर होतं. त्या व्यतिरिक्त माझ्या मनात काही नव्हतं. भविष्यात काय होईल? हा सुद्धा विचार मी केलेला नाही” असं राहुल द्रविड म्हणाले. कोच म्हणून राहुल द्रविड यांच्या पदरी आणखी एक निराशा आली. टीम इंडिया 2003 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळली होती. त्या टीममध्ये राहुल द्रविड होते. फलंदाजी बरोबर विकेटकिपिंगची जबाबदारी त्यांनी संभाळली होती. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यावेळी पराभव केला होता. ते कॅप्टन असताना 2007 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच साखळीतच आव्हान संपुष्टात आलेलं. कोच म्हणून 2023 WTC चॅम्पियनशिप आणि आता 2023 वर्ल्ड कप फायनलमध्ये पदरी अपयश आलं.

ड्रेसिंग रुममधील वातावरण कसं होतं?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनल हरल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये काय वातावरण आहे? त्या बद्दलही राहुल द्रविड यांनी सांगितलं. “मुल खूप निराश आहेत. ड्रेसिंग रुममधील वातावरण भावनात्मक आहे. कोच म्हणून त्यांना अशा स्थितीत पाहण खूप कठीण आहे. मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. मी त्यांना व्यक्तीगत स्तरावर ओळखतो. खूप कठीण आहे. मला खात्री आहे, उद्या सकाळी पुन्हा सूर्य उगवेल. आम्ही पुन्हा पुढे जाऊ. खेळाडू म्हणून हे आमच काम आहे” असं राहुल द्रविड म्हणाले.