IND vs AUS Final | भारतीय क्रिकेट टीम आणि त्यांच्या फॅन्ससाठी 19 नोव्हेंबर हा खूपच निराशाजनक दिवस ठरला. सलग 10 सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने टीम इंडियावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. हा सामना संपल्यानंतर अनेक भारतीयांच मन मोडलं. अनेकांनी मोठ्या मनाने टीम इंडियाचा पराभव स्वीकारला. टीम इंडियाची वर्ल्ड कपमधली कामगिरी लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे संदेश सोशल मीडियावर पोस्ट केलेत. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा, हीच प्रत्येक क्रिकेट चाहत्याची इच्छा होती. टीम इंडियाच या वर्ल्ड कपमधल प्रदर्शनच तसं होतं. त्यामुळे टीम इंडियालाच वर्ल्ड कप विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. दुर्देवाने अखेरच्या सामन्यात काही चूका झाल्या. त्यामुळे टीम इंडियाला झळाळत चषक उंचावण्याची संधी मिळाली नाही.
भारतात क्रिकेटला धर्माच स्थान आहे. त्यामुळे इथे पराभव पचवण खूप कठीण गोष्ट असते. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमधला परफॉर्मन्स पाहून अनके चाहते आपल्या टीमच्या पाठिशी उभे राहिलेत. पण त्याचवेळी काही चाहत्यांना हा पराभव पचवण खूप कठीण गेलं. त्यांना टीम इंडियाचा पराभवच सहन झाला नाही. उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये काही युवकांनी रागाच्या भराच दुकानातून टीव्ही उचलून बाहेर आणले व फोडले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. भारतीय टीमने आमच मन मोडलं असं या युवकांच म्हणणं होतं. पराभवानंतर अशा प्रकारे टीव्ही फोडण्याच्या घटना शेजारच्या पाकिस्तानात घडतात. पण यावेळी भारतात असं घडलं.
हे युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही युवक टीव्हीच्या दुकानात मॅच पाहत उभे असलेले दिसतात. ऑस्ट्रेलियाने जसा सामना जिंकला, दोन युवकांनी दुकानात ठेवलेले टीव्ही उचलून बाहेर आणले व फोडले. असं करु नका, असं दुकानदार त्यांना सांगत होता. पण हे युवक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांच लक्ष्य दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने आरामात 42 चेंडू आणि 6 विकेट राखून हे लक्ष्य पार केलं.