World cup 2023 : विश्वचषक 2023 च्या सामन्यात भारताने रविवारी इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारतीय संघ खुप मोठी धावसंख्या उभी करु शकला नव्हता. त्यामुळे गोलंदाजांची जबाबदारी वाढली होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या चमकदार कामगिरीने भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. भारताच्या विजयानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी एकत्र वंदे मातरम हे गीत गायले. यादरम्यान, एक नेत्रदीपक लाइट शो करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण स्टेडियम दिव्यांनी उजळून निघाले होते. भारताचा या स्पर्धेतील हा सलग सहावा विजय आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. भारतीय फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. भारताच्या विकेट पडू लागल्याने भारत २०० रन तरी करतो की नाही असा प्रश्न भारतीयांना पडला होता. रोहित शर्माच्या ८७ धावांची शानदार खेळी केली.
रोहित शर्माने 101 चेंडूत 87 धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या 49 धावांच्या खेळीमुळे भारताला 50 षटकांत 229 धावा करता आल्या. भारताने 9 विकेट गमावल्या. केएल राहुलने 39 धावांची खेळी केली.
No Indian cricket team fan should leave without liking this beutiful video ♥️
Vande mataram 🇮🇳#INDvsENGpic.twitter.com/Mfb4X4hKsR
— 𝑃𝑖𝑘𝑎𝑐ℎ𝑢☆•° (@11eleven_4us) October 29, 2023
230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी पीचवर टिकूच दिले नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी सुरुवातीलाच इंग्लंडचे कंबरडे मोडले. शमीने 22 धावा देत 4 विकेट घेतले. बुमराहने 32 धावा देत तीन विकेट घेतले. कुलदीप यादवने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. इंग्लंडचे फलंदाज 34.5 षटकात केवळ 129 धावा करू शकले.
या पराभवामुळे इंग्लंडची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. यासोबतच भारत 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या विजयानंतर स्टेडियममध्ये शानदार लाइट शो करण्यात आला. याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.
Vande Mataram 🤝 Light show.
– This is goosebumps 🇮🇳#INDvsENG #IndiaVsEngland #RohitSharma𓃵 #Karmapic.twitter.com/BhN15kdwpY
— Aanchal (@SweetLilQueen) October 29, 2023