टीव्ही 9 मराठी टीम
Mumbai Marathon 2023: बहुचर्चित मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिली मॅरेथॉन 42 किलोमीटर असणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. जवळपास 55 हजार धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. टाटा मुंबई मॅरेथॉनने आता वरळी सिलिंक क्रॉस केलंय. मुंबई मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील धावपटू सहभागी होतात.
काय आहे विशेष व्यवस्था?
मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जागोजागी अनेक स्वयंसेवकांकडून धावपटूंना पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. कोरोनामुळे दोन वर्ष ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. दोन वर्षानंतर मुंबईमध्ये मॅरेथॉन होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप आनंद आहे.
टाटा समूहाकडून आयोजन
टाटा समूहाने या मुंबई मॅरेथॉनच आयोजन केलं आहे. माहीम येथे आयोजित हाफ मॅरेथॉन पोलीस कप मध्ये 14 हजार मुंबईकरांनी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई पोलीस आणि आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पाण्याची आणि मेडिकलची व्यवस्था केली आहे.
लोकल ट्रेनची व्यवस्था
माहीम पासून सुरू झालेल्या 21किमीच्या या हाफ मरेथॉनला भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला. या मरेथॉनसाठी मुंबईतिल अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच विशेष लोकल ट्रेनची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. टाटा मॅरेथॉन भाग घेण्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागातून नागरिक आले आहेत.