IPL 2023 Final : मोठ्या मनाचा Ravindra jadeja, टीमला चॅम्पियन बनवल्यानंतर ज्यूनियरला दिलं खास गिफ्ट

| Updated on: Jun 01, 2023 | 7:44 AM

IPL 2023 Final : रवींद्र जाडेजाने शेवटच्या 2 बॉलवून 10 धावा करुन CSK ला शानदार विजय मिळवून दिला. रवींद्र जाडेजाने विजयी चौकार ठोकल्यानंतर चेन्नईची टीम आणि फॅन्सच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

IPL 2023 Final : मोठ्या मनाचा Ravindra jadeja, टीमला चॅम्पियन बनवल्यानंतर ज्यूनियरला दिलं खास गिफ्ट
Ravindra jadeja
Image Credit source: IPL
Follow us on

अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 चा किताब जिंकला. चेन्नई टीमने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. फायनलमध्ये चेन्नईने गुजरात टायटन्सवर मात केली. चेन्नईला हा विजय सहज मिळाला नाही. त्यांना अखेरपर्यंत लढाव लागलं. एकवेळ चेन्नईपासून विजय दूर जातोय, असं वाटत होतं. पण शेवटच्या दोन चेंडूवर रवींद्र जाडेजाने बाजी पलटवली. चेन्नईला संस्मरणीय विजय मिळवून दिला. या विजयानंतर जाडेजाने एक मन जिंकून घेणारी कृती केली.

लास्ट ओव्हरमध्ये चेन्नईला विजयासाठी 13 धावांची गरज होती. लास्ट ओव्हर टाकणाऱ्या मोहित शर्माने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने पहिले चार चेंडू अचूक यॉर्कर टाकले. त्यानंतरच्या 2 चेंडूंवर 10 धावांची गरज होती. जाडेजाने पाचव्या चेंडूवर सिक्स आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारला.

गिफ्टमध्ये दिली बॅट

रवींद्र जाडेजाने विजयी चौकार ठोकल्यानंतर चेन्नईची टीम आणि फॅन्सच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. संपूर्ण स्टेडियममध्ये विजयी जल्लोष सुरु होता. जाडेजा या विजयाचा नायक आहे. विजयानंतर रवींद्र जाडेजाने या सीजनमध्ये ड्रेसिंग रुम शेयर करणाऱ्या अजय मंडलला खास गिफ्ट दिलं. जाडेजाने ज्या बॅटने चेन्नईला विजय मिळवून दिला, ती बॅट त्याने अजयला गिफ्ट म्हणून दिली. अजयने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याची माहिती दिलीय.


अजय मंडलने इन्स्टा स्टोरीमध्ये काय लिहिलय?

अजय मंडलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या बॅटचा फोटो पोस्ट केला. रवींद्र जाडेजाने फायनलमध्ये 2 चेंडूत 10 धावा ज्या बॅटने केल्या, ती बॅट गिफ्टमध्ये दिलीय. या गिफ्टसाठी त्याने जाडेजाने आभार मानलेत. सोबत चेन्नई फ्रेंचायजीचे सुद्धा आभार मानलेत. कारण CSK ने संधी दिल्यामुळे जाडेजासोबत ड्रेसिंग रुम शेयर करता आला.

चेन्नईने अजय मंडलसाठी किती रक्कम मोजली?

अजय मंडलचा जन्म मध्य प्रदेशात झाला. देशातंर्गत क्रिकेट तो छत्तीसगडकडून खेळतो. अजय ऑलराऊंडर आहे. चेन्नईने या सीजनमध्ये त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलं होतं. अजय मंडलला चेन्नईने या सीजनमध्ये डेब्युची संधी दिली नाही.