IND vs ZIM: इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनल मॅचआधी Rohit Sharma म्हणाला….

| Updated on: Nov 06, 2022 | 5:41 PM

IND vs ZIM: टीम इंडियाने आज सुपर 12 राऊंडमधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर विजय मिळवला. टीम इंडियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

IND vs ZIM: इंग्लंड विरुद्धच्या सेमीफायनल मॅचआधी Rohit Sharma म्हणाला....
Rohit Sharma
Image Credit source: social media
Follow us on

मेलबर्न: टीम इंडियाने आज सुपर 12 राऊंडमधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेवर विजय मिळवला. टीम इंडियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सकडून पराभव झाला. त्यामुळे या मॅचआधीच टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित झाला होता. फक्त ग्रुपमध्ये टॉपवर राहणार का? हा प्रश्न होता. टीम इंडिया ग्रुपमध्ये टॉपवर आहे.

आम्ही ते साध्य केलं

विजयानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “हा खूपच चांगला ऑलराऊंड परफॉर्मन्स होता. आम्ही आधीच सेमीफायनलसाठी पात्र ठरलो होतो. पण आम्हाला आमच्या पद्धतीने क्रिकेट खेळायचं होतं. आम्ही ते साध्य केलं”

सूर्यकुमारबद्दल रोहित काय म्हणाला?

“सूर्यकुमार यादव टीमसाठी खूपच अप्रतिम कामगिरी करतोय. ज्या पद्धतीने तो खेळतोय, त्यामुळे दुसऱ्यांवर दबाव राहत नाहीय. त्याच्या क्षमतेची कल्पना आहे. त्याच्या खेळामुळे दुसऱ्याबाजूला असलेल्या खेळाडूला आपला वेळ घेता येतो. तो फलंदाजी करताना डगआऊटमध्ये एक समाधान असतं. फलंदाजी करताना त्याने त्याचा संयम, धैर्य याचा परिचय दिलाय. आम्हाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती” असं रोहित म्हणाला.

इंग्लंड विरुद्ध मॅचआधी रोहित म्हणाला….

एडिलेडमध्ये इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल मॅच होणार आहे. त्याबद्दल रोहित म्हणाला की, “तिथल्या कंडीशन्सशी लवकरात लवकर जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. इंग्लंड एक चांगली टीम आहे. एक चांगला सामना होईल. आम्ही सेमीफायनलमध्ये चांगले खेळलो, तर अजून एका मोठ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. लाइन अँड लेंग्थ समजून घेण महत्त्वाचं आहे. चाहत्यांनी सर्वच सामन्यांमध्ये उदंड प्रतिसाद आणि पाठिंबा दिला. सेमीफायनलमध्ये सुद्धा आम्हाला अशीच अपेक्षा आहे”