दुबई: IPL 2021 चा खिताब चेन्नई सुपर किंग्सच्या नावे झाला आणि देशभरात सीएसके खासकरुन धोनी फॅन्सनी अक्षरश: उत्सव साजरा केला. तिकडे चेन्नईच्या खेळाडूंनीही मैदानापासून ते ड्रेसिंग रुमपर्यंतच नाही तर बसमध्येही धमाल केली. सीएसकेने फायनलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सला 27 धावांनी माती दिली. ज्यानंतर संपूर्ण देशभरातून नाही जगाच्या अनेक भागातून चेन्नईच्या संघाला शुभेच्छा देण्यात आल्या सोशल मीडियावर सीएसकेचीच हवा दिसून आली. त्यातच संघाचा युवा स्टार खेळाडू शार्दुल ठाकुरचाही वाढदिवस असल्याने त्याची बर्थडे पार्टीही जंगी झाली.
IPL चॅम्पिमयन होताच संघातील खेळाडूंनी हॉटेलवर पोहचून आनंद साजरा करण्याची वाटही पाहिली नाही. त्यांनी थेट बसमध्येच धमाल मस्ती सुरु केली. चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज खेळाडू ड्वेन ब्राव्होचा बसमध्ये डान्स करत असलेला व्हिडीओ सीएसकेने त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड देखील केला आहे.
When you have a DJ, it’s celebration mode #EverywhereWeGo ?#SuperCham21ons #CSKvKKR #WhistlePodu #Yellove ?? @DJBravo47 pic.twitter.com/NjwsBbe0Zb
— Chennai Super Kings – Mask P?du Whistle P?du! (@ChennaiIPL) October 16, 2021
बसमधून संघ हॉटेलला पोहचताच तिथेही मजा मस्ती सुरु झाली. त्यात शार्दुल ठाकुरचा बर्थडे असल्याने मग काय केकवर ताव मारुन खेळाडूंनी धमाल केली. यावेळी कर्णधार धोनी स्वत: पुढाकार घेऊन बर्थडे साजरा करत होता. यालवेळी सर्व खेळाडू नाचत होते. तर शार्दूलने केक कापताच त्याच्यावर ज्यूस आणि वेगवेगळ्या गोष्टी टाकत अगदी बच्चे कंपनीप्रमाणे मस्ती केली.
Go Shardhool… It’s your B’day! ?#SuperBirthday #WhistlePodu #Yellove ?? @imShard pic.twitter.com/K4IzsojkQ7
— Chennai Super Kings – Mask P?du Whistle P?du! (@ChennaiIPL) October 15, 2021
CSK चॅम्पियन होताच त्याच्या फॅन्सनी सोशल मीडियावर अक्षरश: धिंगाणा केला. त्यात ऑस्ट्रेलियापासून ते वेस्टइंडीजपर्यंत शुभेच्छांचा वर्षाव संघावर झाला. CSK चा माजी खेळाडू शेन वॉटसनने ऑस्ट्रेलियातून संघाला शुभेच्छा दिल्या. तर माजी दिग्गज क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यामनी वेस्ट इंडिजमधून संघाचं अभिनंदन केलं.
4 IPL titles and counting. Wow!
I am absolutely over the moon for all of the incredible people @ChennaiIPL
This win will be savoured for a long long time. @MELbet_in @melbet_bangla pic.twitter.com/zkQ9JB81p3— Shane Watson (@ShaneRWatson33) October 16, 2021
Congratulations @ChennaiIPL, @msdhoni & @DJBravo47 ?? https://t.co/VnU5lhocJA
— Sir Vivian Richards (@ivivianrichards) October 15, 2021
हे ही वाचा
IPL चं पुढचं पर्व MS धोनी खेळणार का?, जगाला पडलेल्या प्रश्नाचं धोनीने उत्तर दिलं!
T20 World Cup 2021 मध्ये पाकिस्तानची पहिली लढत भारताशी, सामन्याच्या काही दिवस आधीच संघाला मोठा झटका
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मॅक्सवेलची गर्लफ्रेंड भारतीय वंशाची, लवकरच लग्नबंधनात अडकणार, पाहा PHOTO
(After Winning IPL 2021 Title CSK teams party starts bravo dance in bus video dhonis fun in sharduls birthday party)