अहमदाबाद : एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सच मुख्य बलस्थान आहे. धोनीच्या CSK ला आज 5 व्यां दा आयपीएल चॅम्पियन बनण्याची संधी आहे. चेन्नईकडे धोनी आहे, जो कधीही मॅच पलटू शकतो. त्याचवेळी गुजरात टायटन्सकडे शुभमन गिल आहे. हा प्लेयर धोनी आणि चेन्नईच्या अडचणी वाढवू शकतो. चेन्नई आणि गुजरातची टीम रविवारी आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये आमने-सामने असेल. त्यावेळी सर्वांच्या नजरा गिलवर असतील.
शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 16 सामन्यात 3 शतक आणि 4 हाफ सेंच्युरीसह त्याने एकूण 851 धावा केल्या आहेत. मागच्या सामन्यातही मुंबई इंडियन्स विरुद्ध क्वालिफायर 2 च्या सामन्यात त्याने 60 चेंडूत 129 धावा फटकावल्या होत्या. गिल गुजरातची सर्वात मोठी ताकत आहे. त्यामुळे त्याला लवकर OUT करण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल. शुभमन गिलला धोनी लवकर कसा आऊट करु शकतो, त्याच उत्तर संजय मांजरेकर यांच्याकडे आहे.
The brotherhood ? the camaraderie ⭐ the fireworks on the field ?@ShubmanGill and @sais_1509 lit up the stage in #Qualifier2 against MI. Here’s a very special conversation between the duo as they reflect on each other’s performances! ?#GTvMI | #PhariAavaDe | #Qualifier2 pic.twitter.com/D4fU4zUXLr
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 27, 2023
गिलला बाद करण्यासाठी पावरप्लेमध्ये चेंडू कोणाकडे द्यावा?
गोलंदाजांची डोकेदुखी वाढवणाऱ्या शुभमन गिलला कसं आऊट करायच? ते संजय मांजरेकर यांनी सांगितलं. शुभमन गिल विरुद्ध एमएस धोनी दीपक चाहर आणि एका स्पिन बॉलरचा वापर करेल. गुजरातचा ओपनर शुभमन गिलला आऊट करण्यासाठी धोनीने पावरप्लेमध्ये दीपक चाहर आणि एका स्पिनरचा वापर केला पाहिजे. चाहरकडून गोलंदाजीची सुरवात करावी.
गिलला CSK चा आणखी एक गोलंदाज आणेल अडचणीत
आतमध्ये येणारा चेंडू गिल बॅकफूटवर जाऊन खेळणार, असं संजय मांजरेकर यांना वाटतं. अशावेळी त्याला बाद करण्याची संधी मिळू शकते. महीश तीक्ष्णा सुद्धा चांगला पर्याय असल्याचे संजय मांजरेकरांनी सांगितलं. तीक्ष्णाच्या सरळ येणाऱ्या चेंडूवर गिल चुकला, तर चेन्नईला यश मिळू शकतं. चाहर गिलच्या अडचणी वाढवू शकतो. आयपीएलमध्ये दीपक चाहरने आतापर्यंत तीनवेळा शुभमन गिलला आऊट केलय. त्याच्याविरुद्ध गिलची सरासरी 20.66 आहे.