लंडन : IPL 2023 चा सीजन संपलाय. आता सगळ्यांच लक्ष आहे ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर. 7 जूनपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. जी टीम ही फायनल जिंकेल, ती टेस्ट क्रिकेटमधील अव्वल टीम ठरेल. या सामन्यासाठी दोन्ही टीम्स जोरदार सराव करतायत. फायनलआधी ऑस्ट्रेलियन गोटात थोडं चिंतेच वातावरण आहे.
याच कारण आहे, भारताचा पेस बॉलिंग अटॅक. खासकरुन मोहम्मद सिराजने IPL 2023 मध्ये कमालीची गोलंदाजी केलीय. त्याच्या गोलंदाजीची चर्चा ऑस्ट्रेलियन गोटातही आहे.
जोश हेझलवूडने काय सांगितलं?
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने आयसीसी सोबत खास चर्चा केली. त्याने मोहम्मद सिराज कमालीचा फॉर्ममध्ये असून आग ओकणारी गोलंदाजी करतोय, असं सांगितलं. आरसीबी टीममध्ये थोडा उशिराने दाखल झालो, असं हेझलवूडने सांगितलं. मी सिराजची गोलंदाजी बघितलीय. तो चिन्नास्वामीच्या पाटा विकेट्सवरही जबरदस्त बॉलिगं करत होता. त्याशिवाय त्याचा इकॉनमी रेटही जबरदस्त होता. सिराजने जवळपास प्रत्येक सामन्यात पावरप्लेमध्ये आरसीबीला यश मिळवून दिलं.
टीम इंडियाचा हा गोलंदाज टेस्टमध्ये जास्त धोकादायक
मोहम्मद सिराजने आयपीएल 2023 मध्ये 14 सामन्यात 19 विकेट घेतल्या. सिराजने रेड बॉल क्रिकेट म्हणजे टेस्टमध्ये जास्त धोकादायक आहे. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 47 विकेट्स आहेत. इंग्लंडमधील परिस्थिती मोहम्मद सिराजच्या जास्त फायद्याची आहे. त्याशिवाय दुसऱ्याबाजूला मोहम्मद शमी सुद्धा फॉर्ममध्ये आहे. शमीने 28 विकेट घेऊन पर्पल कॅप मिळवली. आता तो सिराजसोबत मिळून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यासाठी सज्ज आहे.
टीम इंडियाचे तीन मोठे प्लेयर जबरदस्त फॉर्ममध्ये
टीम इंडिया याआधी सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी टीम इंडियाने कुठलीही कसूर ठेवलेली नाही. टीम इंडियाचे मोठे प्लेयर विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. रहाणेला सुद्धा सूर सापडलाय. टीम इंडिया वर्ष 2013 नंतर पहिल्या आयसीसी विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे.