LSG vs MI IPL 2023 : चेन्नईची विकेट कधीही दगा देऊ शकते, ऋतुराजच्या शब्दांमुळे रोहितच वाढेल टेन्शन

| Updated on: May 24, 2023 | 1:49 PM

LSG vs MI IPL 2023 : स्वत: दिग्गज खेळाडू आणि CSK चा कॅप्टन एमएस धोनी या पीचच्या बाबतीत चुकला आहे. कालच्या मॅचमध्ये धोनीच्या नंतर लक्षात आलं, आपण टॉस हरलो ते बरं झालं. कारण या विकेटवर एक फॅक्टर महत्वाचा.

LSG vs MI IPL 2023 : चेन्नईची विकेट कधीही दगा देऊ शकते,  ऋतुराजच्या शब्दांमुळे रोहितच वाढेल टेन्शन
CSK IPL 2023
Image Credit source: PTI
Follow us on

चेन्नई : IPL 2023 मधला पहिला क्वालिफायर सामना काल झाला. आता चेन्नईमध्ये एलिमिनेटरचा सामना होईल. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्ससमोर कृणाल पांड्याच्या लखनऊ सुपर जायंट्सच चॅलेंज असणार आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी ऋतुराज गायकवाड पीच बद्दल जे बोलला, ते ऐकाव लागेल. विकेट आता कशी आहे? त्याबद्दल खुलासा केलाय. ऋतुराज गायकवाडनुसार, 3-4 मॅचआधी चेन्नईची विकेट वेगळी होती आणि आता वेगळी आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध 60 धावांची इनिंग खेळूनही ऋतुराज गायकवाड समाधानी दिसला. “मागचे 3-4 सामने चेन्नईमध्ये पूर्णपणे वेगळे होते. जे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिसलं नाही, ते या मॅचेसमध्ये पहायला मिळालं. आधी ही विकेट चांगली होती. पण आता विकेट बदललीय. तुम्हाला खेळपट्टीशी जुळवून घेऊन बॅटिंग करावी लागेल” असं ऋतुराज गायकवाड म्हणाला.

मुंबईसमोर पीचच आव्हान

IPL मध्ये चेन्नई CSK च होम ग्राऊंड आहे. त्यांनी काल आपला सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला. रोहित शर्मा एलिमिनेटर जिंकून क्वालिफायर 2 खेळायला अहमदाबादला कसा पोहोचणार? हा खरा प्रश्न आहे. कारण मुंबई इंडियन्सला पीच समजून घ्यावा लागेल.

तेव्हा धोनीला समजल टॉस हरण फायद्याच होतं

CSK चा कॅप्टन एमएस धोनी स्वत: दोनवेळा पीचच्या बाबतीत फसलाय. चेपॉकच्या ज्या विकेटवर पहिला क्वालिफायर सामना झाला, त्यावर धोनीला पहिली गोलंदाजी करायची होती. कारण नंतर दवाचा फॅक्टर महत्वाचा ठरतो. पण दव पडला नाही, तेव्हा टॉस हरण्याचा निर्णय पथ्यावर पडल्याच धोनीच्या लक्षात आलं.

त्यावेळी धोनीचा अंदाज चुकला

याच विकेटवर CSK ने पंजाब किंग्स विरुद्ध पहिला सामना खेळला होता. त्यावेळी धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग केली होती. त्याला वाटलेलं दव पडणार नाही. पण मॅच दरम्यान दव पडला. त्यामुळे 200 धावा करुनही CSK ची टीम हरली.
आता चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमना अशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि कृणाल पांड्याच्या टीमला विशेष काळजी घ्यावी लागेल.