IND vs SA Test | भारतीय क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरीज जिंकून इतिहास रचण्याच्या इराद्याने गेली होती. पण टीम इंडियाला पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर भारताच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याच स्वप्नही भंग पावलं. टीम इंडिया आता सीरीजमध्ये जास्तीत जास्त बरोबरी साधू शकते. ही दोन सामन्यांची टेस्ट सीरीज आहे. दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरु होणार आहे. या टेस्ट मॅचबाबत टीम इंडिया गंभीर आहे. टीमचे हेड कोच राहुल द्रविड यांनी नेट्स सेशनमध्ये काही खेळाडूंसोबत खास चर्चा केली.
राहुल द्रविड या दौऱ्याबाबत खूप गंभीर आहेत. टीम इंडिया जेव्हा दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरीज खेळत होती, त्यावेळी टेस्ट टीमचे बहुतांश खेळाडू इंटरा-स्क्वायड मॅच खेळत होते. वनडेमध्ये टीमचा कोचिंग स्टाफ सुद्धा वेगळा आहे. राहुल द्रविड यांनी टेस्ट सीरीजसाठी आधीपासून सरावावर भर दिल्याच यातून दिसून येतं.
कुठल्या दोन खेळाडूंसोबत चर्चा केली?
दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया केपटाऊन येथे पोहोचलीय. टीमने रविवारी नेटमध्ये सराव केला. यावेळी हेड कोच राहुल द्रविड यांनी टीममधील काही खेळाडूंसोबत चर्चा केली. बीसीसीआयने टीमच्या नेट्स सेशनचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात स्पष्टपणे दिसतय की, राहुल द्रविड ओपनर यशस्वी जैस्वाल आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा बरोबर बोलतायत. द्रविडने या दोघांसोबच बराचवेळ चर्चा केली. प्रसिद्ध कृष्णाने सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीमध्ये डेब्यु केला होता. पण तो आपला प्रभाव पाडू शकला नव्हता. पहिल्या इनिंगमध्ये 20 ओव्हर गोलंदाजी केली. 93 रन्स देऊन फक्त एक विकेट घेतला. जैस्वालची बॅट सुद्धा जास्त चालली नव्हती. पहिल्या इनिंगमध्ये त्याने फक्त 17 धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 5 रन्सवर आऊट झाला होता.
#TeamIndia are back in the nets and prepping 🆙 for the 2nd Test in Cape Town👌👌#SAvIND pic.twitter.com/zcY5J0FafW
— BCCI (@BCCI) December 31, 2023
पहिल्या सामन्यात काय चुकलं?
दक्षिण आफ्रिका टूरवर येणाऱ्या टीमसाठी तिथे फलंदाजी आणि गोलंदाजी करण सोपं नसतं. राहुल द्रविड यांनी त्यांच्या करीअरमध्ये अनेकदा आफ्रिकेचा दौरा केला आहे. त्यामुळे ते त्यांचा अनुभव खेळाडूंना सांगत होते. गोलंदाजांना इथे वेगळ्या लाइन-लेंग्थने गोलंदाजी करावी लागते. दक्षिण आफ्रिकेतील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांशी जुळवून घेणं ही फलंदाजांसाठी सुद्धा परीक्षा असते. पहिल्या सामन्यात हेच दिसून आलं. परिणामी टीम इंडियाचा पराभव झाला.