लंडन : देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यामुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियात स्थान मिळालय. जवळपास दीड वर्षानंतर त्याने टीममध्ये कमबॅक केलय. येत्या 7 जूनपासून इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगणार आहे. त्यासाठी अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश केलाय. एकवेळ अजिंक्य टीम इंडियाचा उपकर्णधार होता. पण खराब फॉर्ममुळे त्याला टीममधून वगळण्यात आलं. आता हेड कोच राहुल द्रविड यांनी अजिंक्य रहाणेला दिलासा देणार एक स्टेटमेंट केलय.
WTC फायनल ही अजिंक्यसाठी एकमेव संधी नाहीय, असं राहुल द्रविड यांनी म्हटलय. मुंबईचाच दुसरा खेळाडू श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे अजिंक्य रहाणेला टीम इंडियात स्थान मिळालं. कसोटी संघात अय्यरने रहाणेची जागा घेतली होती.
रहाणे पुन्हा बाहेर जाणार का?
आयपीएलच्या आधी श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या टीममध्ये त्याची निवड केलेली नाही. त्याच्याजागी अजिंक्यला संधी मिळाली. श्रेयस अय्यर टीममध्ये परतल्यानंतर अजिंक्य रहाणे पुन्हा बाहेर जाणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
राहुल द्रविड काय म्हणाले?
सोमवारी पत्रकार परिषदेत हेड कोच राहुल द्रविड यांनी अजिंक्य रहाणेबद्दल महत्वाच विधान केलं. “तुम्ही पुनरागमन केलय. तुम्ही चांगली कामगिरी केली, तर दीर्घकाळ टीममध्ये खेळू शकता” असं द्रविड म्हणाले. अप्रत्यक्षपणे राहुल द्रविड यांनी, अजिंक्य रहाणेची फक्त एका टेस्ट मॅचसाठी निवड झालेली नाही, हे स्पष्ट केलं. त्याने चांगली कामगिरी केली, तर आणखी संधी मिळू शकते. रहाणेच्या पुनरागमनाबद्दल राहुल द्रविड यांन आनंद व्यक्त केला. रहाणेच टीममध्ये असणं ही चांगली बाब आहे, असं द्रविड म्हणाले.
त्याचं टीममध्ये असणं फायद्याच
अजिंक्यकडे बराच अनुभव आहे आणि त्याने स्वत:ला सिद्ध केलय असं राहुल द्रविड म्हणाले. “अजिंक्य इंग्लंडमध्ये काही शानदार इनिंग खेळलाय. स्लीपमध्ये तो शानदार फिल्डिंग करतो. रहाणेने टीमच नेतृत्व केलय. यश मिळवून दिलय. त्यामुळे त्याचं टीममध्ये असणं फायद्याच आहे” असं राहुल द्रविड म्हणाले.