लंडन : लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर 4 जूनला टीम इंडियाने ओव्हल मैदानावर पहिल्यांदा प्रॅक्टिस केली. भारतीय टीमने सकाळच्यावेळी ओव्हलवर प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस तर झाली. पण त्याआधी ओव्हलच्या मैदानावर जे काही झालं, त्यामुळे टीम इंडियाचे हेड कोच नाराज झाले. शुभमन गिलच्या चुकीमुळे राहुल द्रविड नाराज झाले होते. आता प्रश्न हा आहे की, शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मग त्याच्याकडून काय चूक होऊ शकते?.
गिलची ही चूक बेशिस्तीशी संबंधित आहे. तुम्ही म्हणाल, गिल आपल्या खेळावर इतकं लक्ष देतो, मग तो बेशिस्तासारखं कसं वागू शकतो?. गिलने अशी चूक केली की, ज्यामुळे राहुल द्रविड त्याच्यावर नाराज झाले.
गिलने काय चूक केली?
लंडनमध्ये टीम इंडियाच पहिलं प्रॅक्टिस सेशन झालं, त्यावेळी शुभमन गिल तिथे उशिराने पोहोचला. गिल येण्याआधी टीम इंडियाची प्रॅक्टिस सुरु झाली होती. मॅचमध्ये टीम इंडिया ज्या बॅटिंग ऑर्डरमध्ये खेळणार आहे, त्याच ऑर्डरमध्ये प्रॅक्टिस करायची होती. पण गिल उशिराने आल्यामुळे असं होऊ शकलं नाही.
गिलला प्रतिक्षा करावी लागली
राहुल द्रविड यांना हे पटलं नाही. ते शुभमन गिलवर नाराज झाले. त्यांनी रोहित शर्मासोबत विराट कोहलीला प्रॅक्टिसला पाठवून दिलं. त्यानंतर गिल तिथे आला, तेव्हा त्याला बॅटिंगची संधी मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. गिल तिथे आल्यानंतर राहुल द्रविड त्याच्यासोबत बोलले. दोघांमध्ये बराचवेळ बोलणं झालं.
‘
गिलने काय उत्तर दिलं?
या प्रॅक्टिस सेशनच्या एकदिवस आधी शुभमन गिलने फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. त्याने FA कपची फायनल मॅच बघितली होती. त्याला क्रिकेट आणि फुटबॉलच्या प्रेक्षकांमधील फरक विचारण्यात आला, तेव्हा त्याने दोघांची तुलना होऊ शकत नाही असं उत्तर दिलं.
आयपीएलमध्ये गिलने किती धावा केल्या?
शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये त्याने तीन सेंच्युरी झळकवल्या आहेत. त्याने 800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे शुभमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तसाच खेळ दाखवेल अशी अपेक्षा आहे.