Ind vs Aus WTC Final 2023 : रोहितच्या उजव्या बाजूचा फोटो आणि विजेतेपदाच काय आहे कनेक्शन?

| Updated on: Jun 07, 2023 | 9:22 AM

WTC Final 2023 : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. त्या फोटोमधूनच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकणार, असे संकेत मिळतायत.

Ind vs Aus WTC Final 2023 : रोहितच्या उजव्या बाजूचा फोटो आणि विजेतेपदाच काय आहे कनेक्शन?
ind vs aus
Follow us on

लंडन : इतिहासाची पुनरावृत्ती होते, असं म्हणतात. क्रिकेटमध्ये सुद्धा असच होतं. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 7 जूनपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच रंगणार आहे. या सामन्यामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात कोण जिंकणार? चॅम्पियनशिपचा किताब कोण जिंकणार? याचा फैसला पुढच्या 4-5 दिवसात होईल.

क्रिकेटमध्ये अनेकदा योगायोग असतात. क्रिकेट चाहते त्याला संकेत मानून त्यावरुन विजेता संघ कुठला ठरणार? त्या बद्दल अंदाज बांधतात. चाहत्यांनी एकप्रकारे हा स्वत:ला दिलेला दिलासा असतो.

फायनलआधीचा फोटो

लंडनच्या ओव्हल मैदानावर आजपासून फायनलचा सामना सुरु होणार आहे. त्याआधी राजस्थान रॉयल्स फ्रेंचायजीने त्यांच्या टि्वटर अकाऊंटवरुन फोटोंचा एक कोलाज पोस्ट केला आहे. यात रोहित शर्मा आणि पॅट कमिन्सचा फोटो आहे. फायनलच्या आधी ट्रॉफीसोबत दोन्ही कॅप्टन्सनी हा फोटो काढला होता.

या फोटोच वैशिष्टय काय?

इंग्लंडमध्ये झालेल्या 3 वेगवेगळ्या फायनलचा फोटो राजस्थान रॉयल्सने शेयर केलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013, वनडे वर्ल्ड कप 2019 आणि 2021 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचा फोटो आहे. या फोटोमध्ये जे कॅप्टन्स ट्रॉफीच्या उजव्या बाजूला उभे दिसतायत, त्यांनीच फायनलमध्ये बाजी मारली आहे.


असच घडाव, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा

रोहित आणि कमिन्सचा जो फोटो आहे, त्यात भारतीय कॅप्टन रोहित शर्मा उजव्या बाजूला उभा आहे. त्यामुळे आता सुद्धा तसच घडेल, इतिहासाची पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. असं झाल्यास भारताची 2013 पासूनची प्रतिष्ठा संपुष्टात येईल. त्यावेळी भारताने एमएएस धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.

खरा फैसला ओव्हलच्या मैदानात

फोटो ही फक्त योगायोगाची आणि स्वत:ला दिलासा देण्याची गोष्ट आहे. खरा फैसला ओव्हलच्या मैदानात होईल. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. टीम इंडियाला काही प्रमुख खेळाडू नसल्याचा फटका बसू शकतो. पण भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला चांगली लढत देईल.