SA T20 League | क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. क्रिकेटच्या मैदानात तुम्ही खूप कॅच पाहिल्या असतील, पण अशी कॅच क्वचितच पाहिली असेल. दक्षिण आफ्रिकेत सध्या T20 लीग सुरु आहे. त्यामध्ये एडन मार्करमने या कॅचची स्क्रिप्ट लिहिली आहे. घारी सारखी नजर असलेल्या सनरायजर्स ईस्टन कॅपच्या कॅप्टनने चित्त्याची चपळाई दाखवत शानदार कॅच पकडली. 6 जानेवारीला डरबन सुपर जायंट्स विरुद्ध मॅचमध्ये त्याने ही कॅच पकडली. मैदानावरील कॅमेऱ्यांनी ही जबरदस्त कॅच आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. ही कॅच एकदा तुम्ही बघाच.
एडन मार्करमच्या या कॅचने प्रतिस्पर्धी टीमच कंबरड मोडलं. त्यांच्या फलंदाजीला संकटात टाकलं. कारण सामना खूप नाजूक वळणावर होता. डरबन सुपर जायंट्सला विकेट गमावण परवडणार नव्हतं. सनरायजर्स ईस्टर्न कॅपच्या कॅप्टनने जबरदस्त कॅच पकडून मॅचच पलटली.
तिथेच खेळ संपला
एडन मार्करमने जेजे स्मट्सची कॅच पकडली. डरबन सुपर जायंट्स टीमचा तो कणा होता. टॉप ऑर्डर आणि मिडिल ऑर्डरमधील महत्त्वाचा दुवा होता. पण मार्करमने घारीची नजर आणि चित्याच्या चपळाईने अशी कॅच पकडली की, प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजाचा खेळच संपला. जेजे स्मट्स खातही उघडू शकला नाही.
त्यानंतर तेच झालं, जे होणार होतं
सनरायजर्स ईस्टन कॅपच्या टीमने 158 धावा केल्या होत्या. डरबन सुपर जायंट्सचे 13 रन्सवर 2 विकेट गेले होते. त्याचवेळी त्यांचा तिसरा विकेट गेला. त्यानंतर सामन्यात पुनरागमनाचे त्यांचे दरवाजेच बंद झाले. त्यानंतर तेच झालं, जे होणार होतं. मॅचमध्ये डरबन सुपर जायंट्सचा पराभव झाला.
𝐈𝐬 𝐢𝐭 𝐚 𝐛𝐢𝐫𝐝, 𝐢𝐬 𝐢𝐭 𝐩𝐥𝐚𝐧𝐞.. 𝐧𝐨 𝐢𝐭 𝐢𝐬 𝐒𝐮𝐩𝐞𝐫 𝐀𝐢𝐝𝐞𝐧. 🦸♂️#Betway #SA20 #Playoffs #SECvDSG #WelcomeToIncredible pic.twitter.com/WFz4dZJvPW
— Betway SA20 (@SA20_League) February 6, 2024
सनरायजर्स ईस्टर्न कॅपने डरबन सुपर जायंट्सला 51 धावांच्या मोठ्या फरकाने हरवलं. पहिली बॅटिंग करताना एडन मार्करमची टीम सनरायजर्स ईस्टर्न कॅपने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 157 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डरबन सुपर जायंट्स टीमने फक्त 109 धावा केल्या.