मुंबई: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) घरी आनंदाची बातमी आहे. त्याच्या घरी पाळणा हलला आहे. अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा बाबा झाला आहे. अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिकाने (Radhika) त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाल्याचं जाहीर केलं आहे. राधिकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अजिंक्य-राधिका दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. अजिंक्य आणि राधिकांच सप्टेंबर 2014 मध्ये लग्न झालं.
पहिल्यांदा आई-बाबा कधी झाले?
ऑक्टोबर 2019 मध्ये अजिंक्यच्या घरात पहिल्यांदा पाळणा हलला. राधिकाने एका सुंदर मुलीला जन्म दिला होता. त्यांची मुलगी आर्या आता तीन वर्षांची आहे. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आणि सुखरुप असल्याची माहिती अजिंक्यने दिली आहे. त्याने सर्व मित्र-परिवार, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
टि्वटमध्ये काय म्हटलय?
“आज सकाळी राधिकाने बाळाला जन्म दिला. मी आमच्या बाळाच या जगात स्वागत करतो. राधिक आणि बाळ दोघेही चांगले असून तंदुरुस्त आहेत. तुम्ही जे प्रेम आणि आशिर्वाद दिलेत, त्याबद्दल तुमचा आभारी आहे” असं रहाणेने टि्वट केलं.
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) October 5, 2022
टीम इंडियापासून दूर
टीम इंडियातील सहकाऱ्यांनी अजिंक्यला शुभेच्छा दिल्या आहेत. अजिंक्य रहाणे सध्या टीम इंडियाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमधील खराब कामगिरीनंतर अजिंक्य टीमबाहेर आहे.
आयपीएलमध्ये त्याला कोलकाता नाइटर रायडर्सने विकत घेतलं होतं. पण त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यावेळी त्याला दुखापत झाल्याने तो काही महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट झोनने साऊथ झोनवर दणदणीत विजय मिळवला होता.