Ranji Trophy: अजिंक्य रहाणेचा खेळ तीन चेंडूत संपला, चेतेश्वर पूजारा पुन्हा फेल

| Updated on: Feb 24, 2022 | 3:07 PM

रणजीस्पर्धेद्वारे (Ranji Trophy) भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणारे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पूजारा (Cheteshwar pujara) पुन्हा एकदा फेल झाले. Ajinkya Rahane, Cheteshwar Pujara, ranji trophy 2022, mumbai vs goa,

Ranji Trophy: अजिंक्य रहाणेचा खेळ तीन चेंडूत संपला, चेतेश्वर पूजारा पुन्हा फेल
Follow us on

अहमदाबाद: रणजीस्पर्धेद्वारे (Ranji Trophy) भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणारे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पूजारा (Cheteshwar pujara) पुन्हा एकदा फेल झाले. गुरुवारी दोघेही खूप स्वस्तात बाद झाले. मुंबईकडून गोव्याविरुद्ध खेळताना अजिंक्य रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. तो शून्यावर बाद झाला. सौराष्ट्राकडून खेळणारा चेतेश्वर पुजारा ओदिशा विरुद्ध आठ धावांवर बाद झाला. सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकी खेळी साकारली होती. पण आज फक्त तीन चेंडूत रहाणेचा खेळ संपला. मध्यमगती गोलंदाज लक्ष्य गर्गने त्याला पायचीत पकडलं. मुंबईच्या दोन बाद 30 झालेल्या असताना अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण लक्ष्य गर्गने त्याला लगेच पायचीत पकडलं. त्यामुळे मुंबईची अवस्था तीन बाद 30 झाली.

मुंबईकडून फक्त सर्फराझ खानने (63) धावांची अर्धशतकी खेळी केली. गोव्याच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव 163 धावात आटोपला. लक्ष्य गर्ग सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 46 धावा देत सहा विकेट घेतल्या.

चेतेश्वर पुजारा अवघ्या सहा चेंडूंमध्ये बाद झाला. त्याने आठ धावांच्या खेळीत दोन चौकार लगावले. ओदिशाचा मध्यमगती गोलंदाज देबब्रत प्रधानने त्याला झेलबाद केलं. मुंबई विरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात पूजारा पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात 91 धावा केल्या होत्या.

Ajinkya Rahane Cheteshwar Pujara dismissed cheaply in their respective Ranji Trophy matches