मुंबई क्रिकेट टीमने पुन्हा एकदा आपणच देशांतर्गत क्रिकेटमधील किंग असल्याचं सिद्ध करुन दाखवलं आहे. मुंबईने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. मुंबईची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. मुंबईने अंतिम फेरीत मध्य प्रदेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला. मध्य प्रदेशने मुंबईसमोर विजयासाठी 175 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 17.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 180 धावा केल्या. मुंबईसाठी श्रेयांश शेडगे आणि अथर्व अंकोलेकर या जोडीने निर्णायक क्षणी अनुक्रमे 36 आणि 16 अशा धावा केल्या. तर त्याआधी सूर्यकुमार यादव याने 48 तर अजिंक्य रहाणे याने 37 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे याने या संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामिगिरी. रहाणेने केलेल्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं. रहाणेला 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
अजिंक्य रहाणे याने या स्पर्धेत वैयक्तिक खेळीचा आणि विक्रमांचा विचार न करता निर्भिड खेळी केली. रहाणेने मुंबईला विजयी करण्यात निर्णयाक भूमिका बजावली. रहाणेने या हंगामातील एकूण 8 सामन्यांमध्ये 469 धावा केल्या. रहाणेने या 8 डावांमध्ये एकूण तर सलग 3 अर्धशतकं झळकावली. रहाणे जपून खेळला असता तर त्याच्या नावावर 3 शतकंही असती. मात्र रहाणेने आधी सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक विक्रमाच्या मोहात न पडता विजयाला प्राधान्य दिलं. रहाणेने यासह टीकाकारांनाही चोख उत्तर दिलं.
रहाणे प्लेअर ऑफ द सीरिज
A season to remember for sure! 🔥#SMAT #AjinkyaRahane pic.twitter.com/dLoVD5rZtB
— Riddhima (@RiddhimaVarsh17) December 15, 2024
मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, रॉयस्टन डायस आणि अथर्व अंकोलेकर.
मध्य प्रदेश प्लेइंग इलेव्हन : रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, हरप्रीत सिंग भाटिया, व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, राहुल बाथम, शिवम शुक्ला, कुमार कार्तिकेय आणि आवेश खान.