वडिल कारपेंटर, क्रिकेटसाठी संघर्ष, मुलीने 7व्या क्रमांकावर येऊन भारताला मिळवून दिला मोठा विजय

| Updated on: Jan 20, 2023 | 11:38 AM

T20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत ट्राय सीरीज खेळत आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 27 धावांनी विजय मिळवला.

वडिल कारपेंटर, क्रिकेटसाठी संघर्ष, मुलीने 7व्या क्रमांकावर येऊन भारताला मिळवून दिला मोठा विजय
team india
Image Credit source: bcci twitter
Follow us on

नवी दिल्ली – T20 वर्ल्ड कप आधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत ट्राय सीरीज खेळत आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने धमाकेदार विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 27 धावांनी विजय मिळवला. अमनजोत कौर या ऑलराऊंडरने टीम इंडियाच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. तिने 30 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. अमनजोतने या मॅचमधून आंतरराष्ट्रीय डेब्यु केला. पहिल्याच सामन्यात तिने कमाल केली. अमनजोत कौरची कथा कमालीची आहे. या युवा खेळाडूने टीम इंडियात येण्याआधी बराच संघर्ष केलाय.

7 व्या क्रमांकावर येऊन जबरदस्त बॅटिंग

अमनजोत कौर कोण आहे? तिच्या यशामध्ये कोणाच योगदान आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्याआधी अमनजोत कौरने टीम इंडियाच्या विजयाचा पाया कसा रचला? ते जाणून घ्या. अमनजोत 7 व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी उतरली होती. टीम इंडियाने 11.4 ओव्हरमध्ये फक्त 69 धावा केल्या होत्या. 5 फलंदाज तंबूत परतले होते. त्यावेळी अमनजोत कौर क्रीजवर आली. तिने दिप्ती शर्मासोबत मिळूव तुफानी बॅटिंग केली. दोघांनी 76 रन्सची भागीदारी केली. टीमचा स्कोर 147 पर्यंत पोहोचवला. दक्षिण आफ्रिकेची टीम या धावसंख्येचा पाठलाग करु शकली नाही. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 120 धावा केल्या.

डेब्युमध्येच स्वत:ला केलं सिद्ध

अमनजोत कौरने वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदा क्रिकेट अकादमीत पाऊल ठेवलं. आता अवघ्या वयाच्या 23 व्या वर्षी तिने टीम इंडियात डेब्यु केलाय. ही टॅलेंटेड खेळाडू आहे. त्यामुळे तिची सुपरफास्ट एंट्री झालीय. पहिल्याच सामन्यात अमनजोतने स्वत:ला सिद्ध केलय.

वडिलांच मोठं योगदान

अमनजोतची कथा बिलकुल फिल्मी आहे. ती गल्लीमध्ये मुलांसोबत क्रिकेट खेळायची. शाळेत सुद्धा अमनजोत मुलांसोबतच क्रिकेट खेळायची. अमनजोतचे वडिल भूपिंदर सिंह कारपेंटरचे काम करतात. त्यांनी मुलीच क्रिकेटबद्दलच पॅशन समजून घेतलं. भूपिंदर सिंह यांनी मुलीला क्रिकेट अकादमीत दाखल केलं. क्रिकेटसाठी ते दुसऱ्या शहरातही गेले. अखेर चंदीगडमध्ये अमनजोतला चांगली ट्रेनिंग मिळाली. अमनजोतच्या वडिलांनी मुलीसाठी आपलं कामही कमी केलं. ते मुलीला न्यायला-आणायला अकादमीत जायचे.