चेन्नई : IPL च्या 16 व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या यशात एमएस धोनीच नेतृत्व आणि फलंदाजीच योगदान आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळाडू दमदार कामगिरी करतायत. धोनीचा या खेळाडूंवर विश्वास हे त्यामागे मुख्य कारण आहे. अनेकदा विश्वास ठेऊनही अपेक्षेनुसार, रिझल्ट मिळत नाही. आयपीएल 2023 मध्ये अस काही ठिकाणी पहायला मिळतय. एक खेळाडू सातत्याने निराश करतोय.
रविवारी 14 मे रोजी संध्याकाळी चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामना झाला. धोनीने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण अपेक्षेनुसार, रिझल्ट मिळाला नाही.
फ्लॉप कामगिरी
टीमचे फलंदाज फ्लॉप ठरले. फक्त 144 धावा झाल्या. चेन्नईच्या बहुतांश फलंदाजांनी निराश केलं. टीमचा 6 विकेटने पराभव झाला. सीएसकेचा प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष सुरु आहे.
8 व्या ओव्हरमध्ये चेन्नईची दुसरी विकेट
चेन्नईच्या बहुतांश फलंदाजांनी कुठल्या ना कुठल्या मॅचमध्ये आपली छाप उमटवली आहे. पण अंबाती रायुडू असं करण्यात कमी पडलाय. कोलकाता विरुद्ध 8 व्या ओव्हरमध्ये चेन्नईची दुसरी विकेट गेली. त्यावेळी अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू क्रीजवर आला. या सीजनमध्ये त्याने खराब प्रदर्शन केलय.
त्यात तो चुकला व बोल्ड
या मॅचमध्ये चांगल परफॉर्म करण्याची त्याच्याकडे संधी होती. पण या मॅचमध्ये तो फ्लॉप ठरला. 11 व्या ओव्हरमध्ये सुनील नरेनच्या पहिल्या चेंडूवर त्याने आक्रमक स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो चुकला व बोल्ड झाला. रायुडूने 7 चेंडूत फक्त 4 रन्स केले.
संपूर्ण सीजन फ्लॉप शो
रायुडू मागच्या 9 सामन्यात अपयशी ठरला होता. 10 व्या सामन्यातही तोच सिलसिला कायम राहिला. या सीजनमध्ये बहुतांश सामन्यात रायुडूला इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरवलय. पण त्याला आपला इम्पॅकट उमटवता आला नाही. 13 पैकी 10 सामन्यात त्याला बॅटिंगची संधी मिळाली. त्याने 15 च्या सरासरीने 127 च्या स्ट्राइक रेटने फक्त 122 धावा केल्या आहेत.
अजून रायुडू किती विश्वास ठेवणार?
रायुडू 2018 मध्ये चेन्नईचा भाग बनला. या दरम्यान चेन्नईच्या यशात त्याचं योगदान होतं. 2018 ते 2021 दरम्यान चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने त्याला 6.75 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. पण सलग दुसऱ्या सीजनमध्ये तो फ्लॉप ठरला. आता धोनी अजून रायुडू किती विश्वास ठेवणार? असा प्रश्न विचारला जातोय.