मुंबई : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडू याने आज वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अंबाती रायडू याने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आज पक्षात जाहीर प्रवेश केला. अंबाती रायडूचा पक्षात समावेश केल्याने वायएसआर काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तरुणांना पक्षात आणण्याचा निर्णय वायएसआर काँग्रेसने घेतला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य अंबाती रायुडू याला मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी औपचारिकपणे वायएसआर काँग्रेसमध्ये समाविष्ट केले. यावेळी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी हे देखील उपस्थित होते. अंबाती रायडू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
#WATCH | Amaravati: Famous Indian cricketer Ambati Tirupati Rayudu joined the YSR Congress Party in the presence of Andhra Pradesh Chief Minister YS Jagan Mohan Reddy and other leaders. pic.twitter.com/WHZMgad3Iu
— ANI (@ANI) December 28, 2023
अंबाती रायडून याने २०१३ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने एकूण 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 47 च्या सरासरीने त्याने 1694 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकेही आहेत. रायुडूने भारतासाठी 6 टी-20 सामन्यात 42 धावा केल्या आहेत. 2019 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. आयपीएलमध्ये त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते. 2018 मध्ये, तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला. या काळात रायुडूने 203 सामन्यात 4328 धावा केल्या. त्याने मुंबई इंडियन्ससह तीन आणि चेन्नई सुपर किंग्जसह तीन आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.