मेलबर्न: टीम इंडिया दिमाखात T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. आज मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाकडून आज बॅट्समन आणि बॉलर दोघांनी कमालीच प्रदर्शन केलं. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह या वर्ल्ड कपमध्ये कमालीच प्रदर्शन करतोय. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये त्याची गोलंदाजी खेळणं फलंदाजांना जमत नाहीय.
एक सुंदर स्विंग चेंडू टाकला
झिम्बाब्वे विरुद्धच्या आजच्या मॅचमध्ये हे दिसून आलं. त्याचा आज हवेत स्विंग झालेला चेंडू बॅट्समनला कळलाच नाही. झिम्बाब्वेच्या इनिंगमध्ये अर्शदीपने एक सुंदर स्विंग चेंडू टाकला. त्याने झिम्बाब्वेचा फलंदाज रेजिस चकबवाला क्लीन बोल्ड केलं.
पण चेंडू त्याला समजलाच नाही
रेजिस चकबवा अर्शदीपच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू त्याला समजलाच नाही. बॅट हवेत असताना चेंडूने स्टम्पस उडवले होते. चकबवा आपलं खातही उघडू शकला नाही.
टीम इंडियाने झिम्बाब्वेला दबावाखाली ठेवलं
आजच्या मॅचमध्ये सुरुवातीपासून टीम इंडियाने झिम्बाब्वेला धक्के दिले. त्यांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. झिम्बाब्वेकडून रायन बर्लने 35 आणि सिकंदर रझाने 34 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेला धक्का दिला. भारताकडून हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीने प्रत्येकी 2, रविचंद्रन अश्विनने 3, आणि भुवनेश्वर, अर्शदीप, अक्षरने प्रत्येकी 1 विकेट घेतला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 5 बाद 186 धावा केल्या. झिम्बाब्वेची टीम 115 धावांवर ऑलआऊट झाली.
ग्रुपमध्ये टीम इंडिया टॉपवर
टीम इंडियाने सुपर 12 राऊंडमध्ये फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना गमावला. पाकिस्तान, नेदरलँड्स, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅच जिंकून ग्रुपमध्ये 8 पॉइंटससह टॉपवर राहिले.