Ashes Series 1St Test | Sturat Broad ने ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या बॅट्समनला सांगून OUT केलं, VIDEO

| Updated on: Jun 18, 2023 | 12:35 PM

Ashes Series 1St Test | स्टुअर्ट ब्रॉडने दोन महिन्यापूर्वीच कशा पद्धतीने विकेट घेणार ते जाहीरपणे सांगितलं होतं. तसच त्याने मैदानात केलं. जे बोललेला, तेच त्याने मैदानात करुन दाखवलं.

Ashes Series 1St Test | Sturat Broad ने ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या बॅट्समनला सांगून OUT केलं, VIDEO
Ashes Series 1st Test eng vs Aus stuart broad
Image Credit source: ECB Twitter
Follow us on

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये Ashes सीरीज सुरु आहे. Ashes Series चा पहिला कसोटी सामना सुरु आहे. क्रिकेट विश्वात Ashes सीरीजच एक वेगळं महत्व आहे. या कसोटीच्या पहिल्याडावात इंग्लंडने 8 बाद 393 धावांवर डाव घोषित केला. सध्या ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 311 धावा झाल्या आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने काल ऑस्ट्रेलियाला झटक्यावर झटके दिले. ब्रॉडने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट घेतल्या.

ब्रॉडने लागोपाठ दोन विकेट काढून ऑस्ट्रेलियाला दबावाखाली आणलच. पण काही महिन्यांपूर्वी जे बोलला होता, ते ब्रॉडने करुन दाखवलं. ब्रॉडने आधी डेविड वॉर्नरची विकेट काढली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मुख्य फलंदाज मार्नल लाबुशेनला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. ब्रॉडने लाबुशेनला अशाच पद्धतीने आऊट केलं, जसं Ashes सीरीज सुरु व्हायच्या आधी त्याने सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

ब्रॉडने असं होऊ दिलं नाही

इंग्लंडने पहिल्या कसोटीचा पहिला डाव 8 विकेट गमावून 393 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर एकही विकेट न गमावता 14 धावा केल्या होत्या. दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियन टीम चांगली सुरुवात करेल, अशी अपेक्षा होती. पण ब्रॉडने असं होऊ दिलं नाही.


जे बोलला, तेच केलं

ब्रॉडने Ashes Series सुरु होण्याआधी ईएसपीएनक्रिकइन्फोला मुलाखत दिली होती. लाबुशेन आणि स्टीव स्मिथ विरोधात तयारी केल्याची त्याने माहिती दिली होती. या दोघांविरोधात आऊट स्विंगर वापरणार असल्याच ब्रॉडने आधीच जाहीर केलं होतं. स्टॉक डिलिवरी वॉबल सीमवाला चेंडू असतो, जो आतल्याबाजूला येतो. स्मिथ आणि लाबुशेन विरोधात चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आणि तिथेच त्यांना फसवणार असं स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला होता. लाबुशेन मैदानात येताच ब्रॉडने आऊट स्विंग टाकला, ज्यावर तो बाद झाला.


ब्रॉडने लाबुशेनला पहिला आऊट स्विंग चेंडू टाकला. लाबुशेन हा चेंडू खेळायला गेला आणि चेंडूने बॅटची कड घेतली. यष्टीपाठी विकेटकीपर जॉनी बेयरस्टोने शानदार कॅच घेतली.