लखनऊ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. लखनऊच्या टीमने पहिली बॅटिंग केली. बॅटिंगसाठी कठीण असलेल्या विकेटवर लखनऊच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 177 धावा केल्या. लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच झाली. लखनऊ टीमने ज्या धावा केल्या, त्याचं श्रेय मार्कस स्टॉयनिसला जातं. त्याने 47 चेंडूत नाबाद 89 धावा फटकावल्या. LSG ने शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये 54 धावा फटकावल्या. त्यामुळे लखनऊची धावसंख्या 177 पर्यंत पोहोचली.
कॅप्टन कृणाल पांड्याने सुद्धा काल महत्वाच्या क्षणी चांगला खेळ केला. सुरुवातीलाच लखनऊ टीमला तीन मोठे झटके बसले होते. त्यावेळी कृणालने स्टॉयनिससोबत मिळून डाव सावरला. 49 धावांवर खेळत असताना कृणालने दुखापतीमुळे मैदान सोडलं.
एकवेळ लखनऊची खराब अवस्था
कृणाल आणि स्टॉनिसने मिळून 82 धावांची भागीदारी केली. IPL 2023 मध्ये लखनऊ येथे झालेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. दिल्ली विरुद्ध हुड्डा आणि कायली मेयर्सने 79 धावांची भागीदारी केली होती. कालच्या सामन्यात लखनऊच्या 3 बाद 35 धावा होत्या. पण 16 व्या ओव्हरच्या अखेरीस 3 बाद 177 अशी लखनऊची स्थिती होती.
Retired out? #LSGvsMI #KrunalPandya
— Ashwin ?? (@ashwinravi99) May 16, 2023
आर.अश्विनकडून प्रश्नचिन्ह
16 ओव्हरच्या अखेरीस 49 धावांवर खेळत असताना कृणाल पंड्याने मैदान सोडलं. बॅटिंग करताना दुखापत झाल्यामुळे कृणाल मैदानाबाहेर गेला. कृणाल बाहेर गेल्यानंतर निकोलस पूरन आला. कृणालच्या मैदान सोडण्याच्या निर्णयावर अन्य नेटीझन्सप्रमाणे टीम इंडियाचा गोलंदाज आर.अश्विनने सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं. कॉमेंटेटर्स कृणालला दुखापत झाल्याच सांगत होते. त्याचवेळी अन्य नेटीझन्सप्रमाणे अश्विनच्या मते सुद्धा ही रणनितीक चाल होती.’रिटायर्ड आऊट ?’ असं टि्वट अश्विनने केलं.
असा जिंकला सामना
कृणालच्या जागी निकोलस पूरन मैदानावर येऊन विशेष काही फरक पडला नाही. त्याने 8 चेंडूत 8 धावा केल्या. स्टॉयनिस लखनऊ टीमसाठी संकटमोचक ठरला. त्याने शेवटच्या चार ओव्हर्समध्ये 16 चेंडूंचा सामना करताना 40 धावा केल्या. लखनऊने 177 धावा केल्या. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 5 बाद 172 धावा केल्या. लखनऊने हा सामना 5 धावांनी जिंकला.