मुंबई : भारताचा उत्त्कृष्ट फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने (Ravichandran Ashwin) संजय मांजरेकरांच्या (Sanjay Manjrekar) दिग्गज खेळाडू मानत नसल्याच्या प्रतिक्रियेला मजेशीर रिप्लाय देत प्रत्युत्तर दिलं आहे. आधी मांजरेकरांनी ‘आश्विन हा महान खेळाडूंच्या पंगतीत अजून बसत नाही’ अशा आशयाचं ट्विट केलं होतं. ज्याला रिट्विट करत आश्विनने तामिळ चित्रपट अपरिचितमधील एक तामिळ डायलॉगचे मीम पोस्ट केले आहे. ज्याला हसायच्या इमोजीच कॅप्शन दिलं असून या तामिळ डायलॉगचा अर्थ ‘असं नका बोलू, माझं मन दुखतं.’ असा आहे. (Ashwin Replied Sanjay Manjrekar With Funny Meme Reaction For Not Saying Him Greatest Of All Time)
????? https://t.co/PFJavMfdIE pic.twitter.com/RbWnO9wYti
— Mask up and take your vaccine???? (@ashwinravi99) June 7, 2021
सध्यस्थितीला आश्विन भारताचा प्रमुख फिरकीपटू आहे. मागील 7 ते 8 वर्ष कसोटी क्रिकेटमधील फिरकीपटू विभागाच्या प्रमुखाची जबाबदारी आश्विन पार पाडत आहे. त्याने 78 कसोटी सामन्यांत तब्बल 409 विकेट्स घेतलेत. ज्यात एका डावांत 30 वेळा 5 विकेट्स पटकावले आहेत. असे असतानाही भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी आश्विनवर परखड प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्यासाठी दिग्गज खेळाडूची व्याख्या काय आहे? हे स्पष्ट करणारे ट्विट केले. ज्यात त्यांनी लिहिलं, ‘सर्वकालिन महान क्रिकेटपटू म्हटलं जाणं कोणत्याही खेळाडूसाठी खूप मोठी गोष्ट आहे. डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, सुनील गावस्कर, सचिन तेंडूलकर, विराट कोहली यांच्यासारखे खेळाडू माझ्यासाठी महान क्रिकेटर आहेत. मी आश्विनचा पूर्ण मान राखत म्हणतो की तो अजूनपर्यंत सर्वकालिन महान क्रिकेटर नाही.’
‘All- time great’ is the highest praise & acknowledgement given to a cricketer. Cricketers like Don Bradman, Sobers, Gavaskar, Tendulkar, Virat etc are all time greats in my book. With due respect, Ashwin not quite there as an all-time great yet. ?#AllTimeGreatExplained?
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) June 6, 2021
मांजरेकरांनी इएस्पीएन-क्रिकइन्फोचा शो‘रन ऑर्डर’ मध्येही आश्विनबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आश्विनला अजूनही एक दिग्गज खेळाडू म्हटले जाऊ शकत नाही. त्याला तसं संबोधन मला पटत नाही. कारण आश्विनने दक्षिण आफ्रीका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाविरोधात एकदाही एका डावात पाच बळी पटकावलेले नाहीत. त्याउलट अक्षरने इंग्लंडविरोधात 5 विकेट्स घेतले होते. त्यामुळे आश्विनला सर्वकालिन महान गोलंदाज म्हटले जाऊ शकत नाही.
हे ही वाचा :
‘हा’ खेळाडू टीम इंडियामधून बाहेर जाण्याच्या मार्गावर, मागील 20 सामन्यांत केवळ 23 विकेट्स
रवींद्र जाडेजा आणि पत्नी रीवाबाकडून मदतीचा हात, मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केले ‘हे’ काम