टीम इंडिया Asia Cup मधून होणार आऊट, जर हा देश जिंकला नाही

| Updated on: Sep 07, 2022 | 6:14 PM

आशिया कपमध्ये सुपर 4 राऊंड सुरु आहे. आज पाकिस्तानचा अफगाणिस्तान विरुद्ध सामना आहे. टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हा सामना खास आहे.

टीम इंडिया Asia Cup मधून होणार आऊट, जर हा देश जिंकला नाही
team india
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: आशिया कपमध्ये सुपर 4 राऊंड सुरु आहे. आज पाकिस्तानचा अफगाणिस्तान विरुद्ध सामना आहे. टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हा सामना खास आहे. आजच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव आवश्यक आहे. पाकिस्तान जिंकल्यास टीम इंडियाचा फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग बंद होईल.

अफगाणिस्तानच्या टीमने चमत्कार केला, तर टीम इंडियाच्या फायनलच्या आशा जिवंत राहतील. आज भारतीय क्रिकेट चाहते अफगाणिस्तानच्या विजयाची प्रार्थना करतायत.

त्या दोन मॅचमध्ये कोण जिंकलय?

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये हा सामना शारजाहच्या मैदानात खेळला जाईल. दोन्ही टीम्समध्ये टी 20 चे आतापर्यंत दोन सामने झालेत. या दोन्ही मॅचमध्ये पाकिस्तानचा संघ विजेता ठरला आहे.

ग्रुप स्टेजचा रिझल्ट काय?

आशिया कपच्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानी टीम दोन मॅच खेळली होती. यात एका मॅचमध्ये विजय तर एका सामन्यात पराभव झाला. अफगाणिस्तानच्या टीमने दोन्ही मॅच जिंकल्या. त्याशिवाय अफगाणिस्तानच्या टीमचा सुपर 4 च्या पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला. श्रीलंकेने त्यांना पराभूत केलं. पाकिस्तानची टीम सुपर 4 मध्ये यशस्वी ठरली. त्यांनी पाच विकेट राखून टीम इंडियावर विजय मिळवला.

अफगाणिस्तानसाठी या खेळाडूंचा परफॉर्मन्स महत्त्वाचा

पाकिस्तान विरुद्धच्या इतिहास रचण्याचा अफगाणिस्तानचा इरादा असेल. पण त्यासाठी राशिद खानला कमालीचा खेळ दाखवावा लागेल. पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडावं लागेल. हजरतुल्लाह जजई, रहमानुल्लाह गुरबाज यांना दमदार फलंदाजी करावी लागेल. कॅप्टन मोहम्मद नबीला आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने टीमला विजय मिळवून द्यावा लागेल.

पाकिस्तानची गोलंदाजांवर मदार

अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना पाकिस्तानची आपल्या गोलंदाजांवर मदार असेल. हाँगकाँग विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजांनी दमदार परफॉर्मन्स केला होता. त्याच कामगिरीची त्यांना पुनरावृत्ती करावी लागले. पाकिस्तानी गोलंदाजांनी हाँगकाँगच्या अख्ख्या टीमला फक्त 38 धावांवर ऑलआऊट केलं होतं. आजच्या सामन्यात कॅप्टन बाबर आजमवर नजर असेल. बाबर आजमसाठी आशिया कप फारसा चांगला ठरलेला नाही. बाबर आजमची बॅट शांतच राहिली आहे. आजच्या महत्त्वाच्या सामन्यात बाबर आजम दमदार फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल.