आसिफ अलीला इतका राग का येतो? पाकिस्तानात पोहोचताच पहा त्याने काय केलं, VIDEO

| Updated on: Sep 13, 2022 | 6:51 PM

बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीमची आपल्याच घरात अब्रु गेली. आशिया कप संपल्यानंतर पाकिस्तानी टीम मायदेशी रवाना झाली.

आसिफ अलीला इतका राग का येतो? पाकिस्तानात पोहोचताच पहा त्याने काय केलं, VIDEO
Asif ali
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीमची आपल्याच घरात अब्रु गेली. आशिया कप संपल्यानंतर पाकिस्तानी टीम मायदेशी रवाना झाली. फायनलमध्ये पाकिस्तानी टीमचा 23 धावांनी पराभव झाला. पाकिस्तानी टीम एयरपोर्टवर पोहोचल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

एयरपोर्टवर दिसला आसिफ अलीचा राग

एयरपोर्टच्या बाहेर येताच आसिफ अलीने पुन्हा एकदा आपले खरे रंग दाखवले. त्याने एका चाहत्याचा हात झटकला. आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानच्या फरीद अहमद मलिकवर त्याने हात उचलला होता. त्यामुळे आयसीसीने त्याला दंड ठोठावला.

पुन्हा एकदा तसच वर्तन

आता आपल्या घरी दाखल झाल्यानंतर आसिफ अलीने पुन्हा एकदा तसच वर्तन केलं. आसिफ अली स्टेडियमबाहेर येत होता, त्यावेळी एका चाहत्याने त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला.

पुढे निघून गेला

चाहत्याने आसिफ अलीचा हात धरण्याचा प्रयत्न केला. त्यावर पाकिस्तानी खेळाडू चिडला. आसिफ अलीने चाहत्याचा हात झटकला व पुढे निघून गेला. दुसऱ्याबाजूला पाकिस्तानी कॅप्टन बाबर आजमला कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात एयरपोर्ट बाहेर आणण्यात आले.

सुपर फोरमध्ये झाला वाद

आशिया कपमध्येही आसिफ अली वादात सापडला होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुपर 4 चा हायवोल्टेज सामना झाला. शेवटच्या षटकात दोन्ही टीम्स विजयासाठी प्रयत्न करत होते. 19 व्या ओव्हरमध्ये फरीदच्या चेंडूवर आसिफ कॅच आऊट झाला.

सेलिब्रेशनची स्टाइल सहन झाली नाही

अफगाणी गोलंदाजाने आसिफला बाद केल्याचं जोरदार सेलिब्रेशन केलं. आसिफला सेलिब्रेशनची ती स्टाइल सहन झाली नाही. तो खवळला व गोलंदाजावर त्याने हात उगारला. आसिफने आपली बॅटही उचलली होती.


अंपायरना मध्यस्थी करावी लागली

प्रकरण वाढत असल्याचे पाहून अंपायरना मध्यस्थी करावी लागली. पाकिस्तानने कसाबसा या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला. पण ते फायनल जिंकू शकले नाही. श्रीलंकेने त्यांना 23 धावांनी हरवलं. दुसऱ्याबाजूला आशिया कप जिंकणाऱ्या श्रीलंकन टीमच मायदेशात जोरदार स्वागत झालं.