मुंबई: आशिया कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान मध्ये सुपर 4 फेरीचा सामना होत आहे. मागच्या रविवारी झालेल्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. आजही भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचवेळी पाकिस्तानही जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात टॉसही महत्त्वपूर्ण ठरु शकतो. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. टॉस हरल्यामुळे भारतीय संघाच नुकसान होऊ शकतं. या पाच पॉइंट मधून समजून घ्या.
अशी आहे भारताची प्लेइंग – 11
भारत – रोहित शर्मा,(कॅप्टन) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल,
पाकिस्तानची प्लेइंग -11
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन-बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमां, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रऊफ, नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन