मुंबई: आशिया कप स्पर्धेत सुपर 4 फेरी मध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना सुरु आहे. आजच्या सामन्यात कॅप्टन रोहित शर्माने चांगलं उदहारण टीम समोर सेट केलं. रोहित टी 20 क्रिकेट मध्ये आक्रमक इंटेटने खेळण्याबद्दल बोलला होता. आज त्याने सुरुवातही तशीच केली. अगदी पहिल्या षटकापासून पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटून पडला. रोहितने चौफेर फटकेबाजी केली. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज नसीम शाहच्या पहिल्या षटकात त्याने एक चौकार आणि षटकार लगावला. आजच्या सामन्यात टॉस जिंकणाऱ्या संघाला वरचढ ठरण्याची संधी होती. त्यामुळेच पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला.
खेळपट्टी सुरुवातीच्या षटकात गोलंदाजांना अनुकूल ठरेल असा अंदाज होता. पण रोहित-राहुल जोडीने असं घडू दिलं नाही. त्यांनी टीम इंडियाला आक्रमक सुरुवात दिली. पाच षटकातच भारतीय सलामीवीरांच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. रोहित आज मोठी इनिंग खेळला नाही. 16 चेंडूत त्याने 28 धावा फटकावल्या. पण त्याच्या बॅटिंग मध्ये आक्रमकता होती. गोलंदाजांवर वरचढ होण्याची रणनिती होती.
Intent from Rohit Sharma ?#RohitSharma #INDvsPAK pic.twitter.com/vYQ1HzHWpW
— Abhishek ?? (@AbhiBackICT) September 4, 2022
रोहितने त्याच्या 28 धावांच्या खेळीने क्रिकेट चाहत्यांच मन जिंकलं. पहिल्या ओव्हरपासून त्याने धमाकेदार सुरुवात केली. रोहितने 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहित शर्मा क्रिकेट विश्वात हिटमॅन म्हणून ओळखला जातो. आज त्याने फलंदाजी सुद्धा तशीच केली. पहिल्या दोन सामन्यात रोहितची जादू चालली नव्हती. पण आज त्याने ती कसर भरुन काढली.