मुंबई: आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये महत्त्वाचा सामना सुरु आहे. सुपर 4 राऊंड सुरु झाला आहे. मागच्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियावर 5 विकेटने विजय मिळवला होता. आज टीम इंडियासमोर श्रीलंकेच आव्हान आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला आज विजय मिळवणं आवश्यक आहे. रोहित शर्मा आज कॅप्टन इनिंग्स खेळून गेला. त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
रोहित शर्माने आज टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. टीम इंडियाची सुरुवात फार चांगली झाली नव्हती. सलामीवीर केएल राहुल दुसऱ्या आणि विराट कोहली तिसऱ्या ओव्हरमध्ये तंबूत परतला. राहुलने 6 धावा केल्या. पण विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. भारताची 2 बाद 13 अशी स्थिती होती.
The Rohit Sharma Show !
Rohit playing against Sri Lanka, a better love story than Twilight ?@ImRo45 #RohitSharma#INDvSL pic.twitter.com/qouUAf4uUy
— Daily Dose of Hitman ? (@PureRohitian45) September 6, 2022
टीम इंडियाचा डाव अडचणीत येणार असं वाटत होतं. त्यावेळी रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने डाव सावरला. रोहितने स्वत: आघाडीवर राहून उदहारण सेट केलं. विकेट गेल्या होत्या. पण धावगती मंदावणार नाही याची त्याने काळजी घेतली. रोहितने आज चौफेर फटकेबाजी केली. चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने आज 41 चेंडूत 72 धावा फटकावल्या. यात 5 चौकार आणि 4 सिक्स आहेत. रोहित शर्मा करुणारत्नेच्या गोलंदाजीवर आऊट झाला. फटकेबाजी करताना त्याने निसंकाकडे झेल दिला.