मुंबई: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अफगाणिस्तान विरुद्ध मोक्याच्या क्षणी 2 सिक्स मारुन त्याने पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये नसीम शाहच्या हातात अनेक मोबाइल फोन्स दिसतायत. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर 4 चा सामना सुरु होता. त्यावेळी नसीम शाहच्या हातात मोबाइल फोन होता. या सामन्यासाठी पाकिस्तान टीम मॅनेजमेंटने नसीम शाहला विश्रांती दिली होती. बाऊंड्री लाइन बाहेर उभा राहून नसीम क्रिकेट चाहत्यांशी बोलत होता.
बाऊंड्री लाइनवर उभा असताना नसीमने चाहत्यांकडे मोबाइल फोन मागितले. तो असं काही करेल, याची कोणी कल्पनाच केली नव्हती. फॅन्सनी त्याला 2-3 मोबाइल फोन्सही दिले. त्यानंतर नसीम शाह त्यांचे मोबाइल फोन खिशात ठेऊन फिरत होता. ब्रेक दरम्यान त्याने सेल्फी घेऊन हे फोन चाहत्यांना परत केले. सोशल मीडियावर हा दावा करण्यात आला आहे. लाइव्ह मॅचमध्ये नसीम शाहा हातात मोबाइस कसा ठेऊ शकतो? असा चाहत्यांचा सवाल आहे.
आयसीसीच्या नियमानुसार, ड्रेसिंग रुम, खेळाच्या मैदानात मोबाइल फोन, कम्युनिकेशन उपकरण वापरण्यावर बंदी आहे. 2018 साली आयसीसीने पाकिस्तानला याच कारणासाठी इशारा सुद्धा दिला होता. कारण लॉर्ड्सवरील सामन्यादरम्यान काही खेळाडू स्मार्टवॉच घालून फिरत होते. पाकिस्तान सुपर लीग दरम्यान डगआऊटमध्ये मोबाइल फोन वापरण्यावरुन वाद झाला होता.
Ye kaam theek hai. pic.twitter.com/bOx6pakqbX
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 9, 2022
मॅच दरम्यान नसीम शाहचं मोबाइल हातात घेणं. त्याचं कारण काय? हे अजूनही अनेक चाहत्यांना समजलेलं नाही. सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवला. श्रीलंकेने 5 विकेटने विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 122 धावांचे टार्गेट दिलं होतं. श्रीलंकेने 18 चेंडू आधीच विजयी लक्ष्य गाठलं.