मुंबई: आशिया कप 2022 चं काउंटडाउन सुरु झालय. त्याचबरोबर भारतीय संघ व्यवस्थापनाची कुठल्या 11 खेळाडूंना संधी द्यायची, त्यावरुन डोकेदुखी वाढलीय. भारतीय संघाकडे सध्याच्या घडीला क्वालिटी विकेटकीपर आहेत. दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन हे विकेटकिपींग सोबत तडाखेबंद फलंदाजी सुद्धा करु शकतात. आशिया कपच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकपैकी कोणा एकाला जागा मिळेल. या बद्दल आतापासूनच विविध तर्क लढवले जात आहेत.
ऋषभ पंतला पहिली पसंती मिळेल, हे स्पष्ट आहे. पण दिनेश कार्तिककडून त्याला कडवी टक्कर मिळत आहे. आशिया कप भारतासाठी टी 20 वर्ल्ड कप आधी एक मोठा इवेंट आहे. आता प्लेइंग इलेव्हन मध्ये दोघांना जागा मिळते की, एकाला हे लवकरच कळेल. टीम मधल्या स्थानावरुन पंतने मोठ विधान केलय. “टीम मध्ये मला जागा मिळते की, कार्तिकला ते कोच आणि कॅप्टनवर अवलंबून आहे”. दोन्ही खेळाडू मॅचविनर आहेत. फक्त काही चेंडूं मध्ये ते खेळाची दिशा बदलू शकतात.
मागच्या 10 डावातील पंत आणि कार्तिकच्या प्रदर्शनाची तुलना केली, तर पंतने 171 धावा आणि कार्तिकने 155 धावा केल्यात. कार्तिकच्या 55 धावांच्या इनिंगच्या तुलनेत पंतची 44 धावांची खेळी सर्वश्रेष्ठ आहे. पंतला अनेकदा वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवल जातं. कार्तिकचा वापर फिनिशर म्हणूनच केला जातो. दोन्ही खेळाडू अनेकदा प्लेइंग इलेव्हन मध्ये एकत्र खेळले आहेत. टीम मॅनेजमेंटने कोणा एकाला संधी द्यावी, असं माजी खेळाडूंच मत आहे. त्यामुळे संघात संतुलन साधलं जाईल.