मुंबई: आशिया कप 2022 (Asia Cup) स्पर्धेआधी पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीच्या (shaheen afridi) रुपात झटका बसला आहे. दुखापतीमुळे आफ्रिदी आशिया कप स्पर्धेला मुकणार आहे. आफ्रिदी बाहेर गेल्याने पाकिस्तानच भारताविरुद्ध (IND vs PAK) आव्हानही कमकुवत झालं आहे. पाकिस्तानची नजर आता आफ्रिदीला पर्याय शोधण्यावर आहे. नेदरलँड विरुद्ध सामन्यात 5 वाइड बॉल टाकणाऱ्या एका गोलंदाजावर पाकिस्तानची नजर आहे. आफ्रिदीच्या जागी तो गोलंदाज पर्याय बनू शकतो. त्याचं नाव आहे नसीम शाह. नेदरलँड विरुद्ध सामन्यात त्याने 33 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्याचवेळी त्याने 5 वाइड चेंडूही टाकले.
“आफ्रिदी जगातील टॉप गोलंदाज आहे. त्यांने मोठ मोठ्या संघाना धक्का दिला आहे. तो बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानच नुकसान झाल आहे” असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलैन मुश्ताक म्हणाला. नेदरलँडस विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यातील नसीम शाहच्या प्रदर्शनावर सकलैन मुश्ताक म्हणाला की, “त्याने ज्या पद्धतीच प्रदर्शन केलय, ते पाहता तो सुद्धा येणाऱ्या दिवसातील सुपर स्टार आहे. त्याने ज्या कंट्रोल आणि माइंडने गोलंदाजी केली. त्यामुळे सामन्यात तो यशस्वी ठरला”
नेदरलँडस आणि पाकिस्तानमधील तिसऱ्या सामन्याबाबत बोलायच झाल्यास, नेदरलँडसने पाकिस्तानला सहज जिंकू दिलं नाही. प्रथम फलंदाजी करताना बाबर आजमच्या संघाने 206 धावा केल्या. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या नेदरलँडच्या संघाने 49.2 षटकात 197 धावा केल्या. पाकिस्तानने 9 धावांनी विजय मिळवला. नसीमने 33 धावात 5 विकेट घेतल्या. नसीम शाहचा आशिया कप मध्ये शाहीन आफ्रिदीच्या जागी पाकिस्तानी संघात समावेश होऊ शकतो.