IND vs PAK | शाहीन आफ्रिदीसोबत दुर्घटना, भारताविरुद्ध मॅच न खेळल्यास पाकला बसणार ‘हे’ 5 फटके

| Updated on: Aug 31, 2023 | 2:00 PM

IND vs PAK | भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानसाठी वाईट बातमी. पाकिस्तानचा स्टार पेसर शाहीन आफ्रिदीला दुखापत झालीय. आशिया कप स्पर्धेत नेपाळ विरुद्धच्या सामन्यात त्याला ही दुखापत झाली. भारत-पाकिस्तान सामना येत्या 2 सप्टेंबरला होणार आहे.

IND vs PAK | शाहीन आफ्रिदीसोबत दुर्घटना, भारताविरुद्ध मॅच न खेळल्यास पाकला बसणार हे 5 फटके
ind vs pak shaheen afridi
Image Credit source: AFP
Follow us on

नवी दिल्ली : शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानचा अव्वल खेळाडू आहे. टीम इंडियाला सर्वात जास्त धोका त्याच्यापासून आहे. पण येत्या 2 सप्टेंबरला कदाचित टीम इंडियासमोर शाहीन शाह आफ्रिदीच आव्हान नसेल. शाहीन कदाचित भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. नेपाळ विरुद्धच्या मॅचमध्ये शाहीन शाह आफ्रिदीसोबत एक दुर्घटना घडली. त्याला या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे शाहीन शाह आफ्रिदीला मैदान सोडाव लागलं. तो गोलंदाजीला परत आला नाही. शाहीन मैदानात परतला, पण त्याने गोलंदाजी केली नाही. आशिया कप स्पर्धेत नेपाळ विरुद्ध शाहीन शाह आफ्रिदीने 5 ओव्हर गोलंदाजी केली.

त्याने 10 ओव्हर सुद्धा पूर्ण गोलंदाजी केली नाही. शाहीन शाह आफ्रिदीने दुखापत होण्याआधी त्या 5 ओव्हर टाकल्या. शाहीनची दुखापत किती गंभीर आहे? ते अजून स्पष्ट नाहीय. पण एक मात्र नक्की, पाकिस्तानसाठी ही चांगली बाब नाहीय. शाहीन भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळला नाही, तर 5 आघाडंयावर पाकिस्तानच नुकसान होऊ शकतं. येत्या 2 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची सगळ्यांना उत्सुक्ता आहे. मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कप सामन्यात दोन्ही टीम्स आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला.

1 शाहीन भारताविरुद्ध खेळला नाही, तर सर्वात पहिलं नुकसान म्हणजे सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट मिळणार नाहीत. शाहीनच वैशिष्ट्य म्हणज़े तो नव्या चेंडूने विकेट काढतो. पाकिस्तानला त्याच्याकडून ज्या सुरुवातीची अपेक्षा असते. तशी सुरुवात तो करुन देतो.

2. पावरप्लेमध्ये सुद्धा पाकिस्तानच नुकसान होईल. पावरप्लेमध्ये शाहीन फक्त विकेट मिळवून देत नाही, तर तो धावगतीवर सुद्धा लगाम लावतो.

3. भारतीय ओपनर्सना सर्वाधिक धोका शाहीन आफ्रिदीपासून आहे. तो फसवण्यात माहीर आहे. शाहीन आफ्रिदी खेळत नसेल, तर ओपनर्सना विकेटवर पाय रोवण्याची संधी मिळेल. असं झाल्यास पाकिस्तान सुरुवातीपासूनच बॅकफूटवर जाईल.

4. शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानचा सर्वात मोठा विकेटटेकर आहे. फक्त पावरप्लेमध्येच नाही, मधल्या ओव्हर्समध्येही शाहीन शाह आफ्रिदी हे काम करतो. पाकिस्तानसमोर खेळपट्टीवर जमलेल्या जोड्या तो़डण्याचा विषय येतो, त्यावेळी शाहीन शाह आफ्रिदी त्याचं उत्तम उत्तर आहे.

5. शाहीन फक्त नव्या चेंडूने गोलंदाजी करतो, अस कोण म्हणेल. डेथ ओव्हर्समध्ये सुद्धा तो तितकीच कमालीची गोलंदाजी करतो. आपल्या गोलंदाजीने तो प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना धावा बनवण्यापासून रोखतो.