IND vs PAK : रोहित शर्माला जाणवू शकते पाकिस्तानचा टॉप ऑर्डर बर्बाद करणाऱ्या गोलंदाजाची कमतरता

| Updated on: Sep 01, 2023 | 3:34 PM

IND vs PAK : त्याची कमतरता कशी भरुन काढणार?. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये या गोलंदाजाने पाकिस्तानची वाट लावली होती. त्याने पाकिस्तानचा टॉप ऑर्डरला हादरे दिले होते. आता हाच गोलंदाज आशिया कप स्पर्धेत नाहीय.

IND vs PAK : रोहित शर्माला जाणवू शकते पाकिस्तानचा टॉप ऑर्डर बर्बाद करणाऱ्या गोलंदाजाची कमतरता
ind vs pak asia cup 2023
Image Credit source: AFP
Follow us on

नवी दिल्ली : टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने आशिया कप 2023 स्पर्धेच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सामंना 2 सप्टेंबरला पल्लिकेलेमध्ये खेळला जाणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उत्सुक्ता आहे. भारत-पाकिस्तानमध्ये मागचे काही सामने खूपच रोमांचक झाले आहेत. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. रोहित आणि बाबर दोघांच्या टीम कमालीच्या फॉर्ममध्ये आहेत. आत उद्याच समजेल कोण-कोँणावर भारी पडेल. दोन्ही कर्णधार बेस्ट टीममसोबत मैदानावर उतरतील. या सामन्याआधी काही क्रिकेट चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे. आशिया कप स्पर्धेत रोहित शर्माला एका खेळाडूची उणीव भासू शकते. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने पाकिस्तानची वाट लावली होती.

टीम इंडियाकडे आशिया कप स्पर्धेसाठी लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज नाहीय. क्रिकेट विश्वातील प्रत्येक मोठी टीम इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलंड लेफ्ट आर्म गोलंदाजाशिवाय मैदानात उतरत नाहीत. टीम इंडिया लेफ्ट आर्म गोलंदाजाशिवाय चॅम्पियन बनण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाकडे अर्शदीप सिंहच्या रुपात लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पण त्याची आशिया कपसाठीच्या टीममध्ये निवड करण्यात आलेली नाहीय. रोहित शर्माला अर्शदीपची कमतरता जाणवेल असं अनेक क्रिकेट चाहत्यांना वाटतय. अर्शदीपची कमतरता जाणवली तर ती भरुन कशी काढणार?. अर्शदीपने मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरची वाट लावली होती. पाकिस्तान प्रामुख्याने ज्या फलंदाजांवर अवलंबून होता, त्यांनाच अर्शदीपने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं.

टी 20 वर्ल्ज कपमध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा होता?

अर्शदीप सिंहने ओपनर मोहम्मद रिजवानला 4 रन्सवर आणि कॅप्टन बाबर आजमला शुन्यावर आऊट केलं होतं. अर्शदीपने दोन्ही स्फोटक फलंदाजांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. त्याने टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता. त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देऊन 3 विकेट काढल्या होत्या. पल्लिकेलेमध्ये टीम इंडियाला अर्शदीपची उणीव जाणवू शकते.

भारताकडे एकही लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज नाहीय. त्याचवेळी पाकिस्तानकडे शाहीन शाह आफ्रिदीच्या रुपाने मोठा वेगवान गोलंदाज आहे. टीम इंडियासमोर आफ्रिदीच आव्हान असेल. अपगाणिस्तानची टीम सुद्धा लेफ्ट आर्म पेसरसह आशिया कप खेळत आहे. एक लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाज किती महत्त्वाचा आहे, हे ऑस्ट्रेलिया, इंग्लंडच्या टीमला चांगलं कळतं.