Asia Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात आयोजित होणार आहे. आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तानचे सामने कुठे होणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. आता या प्रश्नाच उत्तर मिळतय. आशिया कप पाकिस्तानात होणार हे निश्चिच आहे. पण टीम इंडिया आशिया कपचे सामने पाकिस्तानात खेळणार नाही. दुसऱ्या देशात टीम इंडिया आशिया कपचे सामने खेळेल.
भारतीय टीम आशिया कपचे सामने पाकिस्तानात न खेळता दुसऱ्या देशात खेळणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, भारताचे आशिया कपचे सामने यूएई, ओमान, श्रीलंका आणि इंग्लंड यापैकी एका देशात होऊ शकतात. अन्य टीम्स पाकिस्तानमध्ये खेळतील. या संदर्भात अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही. या सामन्यांचे आयोजन कुठल्या देशात होणार? त्याची उत्सुक्ता आहे.
आशिया कपमध्ये एकूण किती सामने?
यंदाचा आशिया कप 50 ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. मागचा आशिया कप 20 ओव्हरच्या फॉर्मेटमध्ये खेळला गेला होता. आशिया कपची फायनल पकडून एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. एकूण 6 टीम्स या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि एक क्वालिफायर टीम असेल. टुर्नामेंटमध्ये दोन ग्रुप असतील. दोन्ही ग्रुपमध्ये 3-3 टीम्स असतील. एकूण 6 सामने खेळले जाणार आहेत. टॉप 2 टीम्समध्ये सेमीफायनल मॅच होईल.
भारत-पाकिस्तानमध्ये किती सामने होतील?
भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपचे 3 सामने होण्याची शक्यता आहे. दोन्ही टीम्सना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलय. श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. आता दोन्ही टीम्समध्ये कुठल्या देशात सामने खेळले जाणार, याची फॅन्सना उत्सुक्ता आहे.