नवी दिल्ली : आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावरुन फडफड करणाऱ्या पाकिस्तानला BCCI ने जागा दाखवून दिली आहे. आशिया कप स्पर्धा संकटात आहे. स्पटेंबरमध्ये आशिया कप स्पर्धेच आयोजन आता जवळपास अशक्य वाटतय. पाकिस्तानच हायब्रिड मॉडेल फेटाळण्यात आलय. पाकिस्तानने आशिया कपच्या आयोजनासाठी हायब्रिड मॉडेल दिलं होतं. एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या सर्वच सदस्यांनी हे मॉडेल फेटाळून लावलय. हे मॉडेल मान्य नसल्याने आता पाकिस्तान आशिया कप खेळणार नाही, असं म्हटलं जातय.
आता तुम्ही म्हणाल पाकिस्तान आशिया कप खेळणार नाही, मग काय नकुसान होईल?. आशिया कपमध्ये पाकिस्तान नसल्याने ब्रॉडकास्टर्सच मोठं नुकसान होऊ शकतं.
जाहीरातीचे रेट दुप्पट असतात
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान ही सर्वात मोठी मॅच असते. संपूर्ण क्रिकेट विश्वाच या सामन्यावर लक्ष असतं. जाहीरातीचा पैसाही दुप्पट असतो. सहाजिकच भारत-पाकिस्तान सामना होणार नसेल, तर ब्रॉडकास्टर्स या टुर्नामेंटमधून आपले हात खेचून घेऊ शकतात.
पाकिस्तानच हायब्रिड मॉडेल काय होतं?
पाकिस्तानच हे हायब्रिड मॉडेल काय होतं? ते जाणून घेऊया. पीसीबीच्या हायब्रिड मॉडेलच्या प्रस्तावानुसार, पाकिस्तानला आशिया कपचे 3 ते 4 सामने आपल्या देशात आयोजित करायचे होते. भारत आपले सामने पाकिस्तान ऐवजी दुसऱ्या देशामध्ये खेळला असता. पण बीसीसीआय यासाठी तयार नव्हती.
आता पाकिस्तान समोर फक्त दोन पर्याय
क्रिकेट विश्वातील शक्तीशाली बोर्ड असलेल्या बीसीसीआयला श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानने साथ दिली. त्यामुळे पीटीआयच्या बातमीनुसार, या टुर्नामेंटवर आता संकटाचे ढग आहेत. पाकिस्तानकडे दोन पर्याय आहेत. या टुर्नामेंटच यजमानपद सोडावं किंवा टुर्नामेंटमधून माघार.
बीसीसीआयकडे आशिया कपची भरपाई करण्याचा दुसरा प्लान
आशिया कप रद्द झाल्यास, बीसीसीआय चार देशांच्या वनडे सीरीजच आयोजन करु शकते. या चौरंगी मालिकेत भारत, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेची टीम खेळेल. सामने 50 ओव्हर्सचे असतील. वनडे वर्ल्ड कपच्या तयारीच्या दुष्टीने ही चांगली संधी आहे.