सिल्चर : भारतीयासांठी जीवकी प्राण असणाऱ्या क्रिकेटने अनेकांचं आयुष्य बदललं. चांगला खेळ करणाऱ्या अनेकांच्या जीवनाला क्रिकेटने कलाटणी दिली. मग ते तिकीट चेकर महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) असो किंवा पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगा यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) अनेक सामान्य घरातील मुलांना क्रिकेटने कुठच्या कुठे उचलून ठेवलं. पण या सगळ्यांमध्ये एक असंही उदाहरण आहे कि एकेकाळी सौरव गांगुली (Sourav Ganguly), सचिन तेंंडुलकर ( Sachin Tendulkar) अशा अनेक दिग्गजांना गोलंदाजी करणारा फिरकीपटू आज पोट भरण्यासाठी रस्त्याशेजारी चहा विकतो आहे. (Assam Spinner Prakash Bhagat Who Bowled Sachin Tendulkar Sehwag Ganguly Now Selling tea For living)
ही दुर्देवी कहानी आहे आसाम संघाचा माजी फिरकीपटू प्रकाश भगत (Prakash Bhagat) याची. आसामकडून रणजी करंडक खेळणार्या प्रकाशने एकेकाळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी अनेक दिग्गजांना गोलंदाजी करणाऱ्या प्रकाशने भारतीय क्रिकेटचा दादा अर्थात सौरव गांगुलीला ही नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. पण नंतर हव्या तशा संधी न मिळाल्याने आणि घरची परिस्थिती हालाखीची झाल्याने प्रकाशने क्रिकेट सोडले. आता तो आपले कुटुंब चालविण्यासाठी चहा विकत आहे.
2010 मध्ये आसाम संघातून रणी करंडक खेळलेल्या प्रकाशच्या वडिलांचे 2011 मध्ये निधन झाले. त्यानंतर मात्र प्रकाशला क्रिकेट सोडून घरचे चालवत असलेल्या चाटच्या धंद्यात मदत करावी लागली. त्यानंतर मोठ्या भावाला मदत करणाऱ्या प्रकाशवर आता कोरोनाच्या संकटात आणखीच हालाखिची परिस्थितीत आली असून आता त्याला चहा विकावा लागतो आहे.
हे ही वाचा :
नागपुरातील राष्ट्रीय खेळाडूवर फूटपाथवर मोमोज विकण्याची वेळ, मायबाप सरकार मदतीचा हात द्या!
तगड्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण, सलामी कसोटी सामन्यातच 10 विकेट, मग 30 वर्षाच्या वयात हत्या
दर्जा! अशी चिवट फलंदाजी पाहिली नसेल, 104 ओव्हरमध्ये केवळ 122 धावा, एकाच खेळाडूने खेळले 278 चेंडू
(Assam Spinner Prakash Bhagat Who Bowled Sachin Tendulkar Sehwag Ganguly Now Selling tea For living)