लंडन : क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे योगायोग घडत असतात. कधी कधी एकाच सामन्यात दोन खेळाडू पदार्पण करतात, कधी अंडर 19 चषकात कर्णधार म्हणून आमने-सामने आलेले वरिष्ठ चषकात देखील कर्णधार म्हणून आमने सामने येतात. एकदातर इंग्लंड आणि वेस्टइंडीज सामन्यात 10 हून अधिक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. पण याहून विशेष म्हणजे जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठी नावं असणाऱ्या तीन खेळाडूंनी देखील एकाच सामन्यात निवृत्ती घेतली होती. यातील एक भेदक गोलंदाज, धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक होता. हा योगायोग आजच्याच दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला इंग्लंडच्या ओवल मैदानात घडला होता.
इंग्लंड आणि वेस्टइंडीज (England vs West Indies) या संघात 1991 मध्ये 8 ते 12 ऑगस्ट या काळात ओवलच्या मैदानात कसोटी सामना खेळला जात होता. टेस्ट खेला गया. हा सामना वेस्टइंडीजचा दिग्गज यष्टीरक्षक जेफ डुजोन (Jeff Dujon), वेगवान गोलंदाज मॅल्कम मार्शल (Malcolm Marshall) आणि धुरंदर फलंदाज विव रिचडर्स (Viv Richards) यांचा शेवटता कसोटी सामना ठरला. तिघेही सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला राम राम करतच मैदानाबाहेर पडले.
इंग्लंडने सामन्यात प्रथ्म फलंदाजी करत 419 धावा केल्या. ज्यात रोबिन स्मिथने 109 धावा, कर्णधार ग्राहम गूचने 60 आणि एच. मॉरिसने 44 धावाचं योगदान दिलं. क्रिस लुइसही नाबाद 47 धावांवर राहिला. विंडीजकडून कर्टली एंब्रोस आणि कर्टनी वॉल्श यांनी तीन-तीन विकेट्स घेतले. ज्यानंतर वेस्टइंडीजचा पहिला डाव अवघ्या 176 धावावंर गुंडाळला. डेसमंड हेंसने केवळ नाबाद 75 रन्स केले. इंग्लंडकडून 6 विकेट फिल टफनेल याने घेतले. वेस्टइंडीजने फॉलोऑन खेळत 375 धावा केल्या. यात रिचर्डसनने 121 धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार विव रिचडर्सने 60 आणि कार्ल हूपरने 54 धावा केल्या. ज्यानंतर इंग्लंडला विजयासाठी केवळ 143 धावांचे लक्ष्य होते जे त्यांनी 5 विकेट्च्या बदल्यात मिळवत सामना खिशात घातला.
हे ही वाचा
IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?
(At west indies vs england test jeff dujon malcolm marshall viv richards took retirement on this day)