Athiya Shetty After Wedding : मागच्या आठवड्यात अभिनेत्री आथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल विवाहबद्ध झाले. अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर दोघांच लग्न झालं. निवडक कुटुंबीय आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. मागच्या दोन-तीन वर्षांपासून आथिया-राहुलच्या प्रेम प्रकरणाची चर्चा होती. अखेर मागच्या आठवड्यात त्यांची रिलेशनशिप विवाहाच्या नात्यात बदलली. लग्नानंतर काही तासात दोघांची पहिली झलक पहायला मिळाली होती. त्यावेळी हा जोडा खूपच शोभून दिसला होता. लग्नानंतर राहुलने तीनच दिवसात एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तो जीममध्ये व्यायाम करताना दिसला होता. आता आथिया आणि राहुल यांना एकत्र डिनर डेटवर स्पॉट केलय. यावेळी आथियाचा लूक आणि आऊटफिट खूपच बोल्ड होता. आथियाच्या गळ्यात मंगळसूत्र, डोक्यात सिंदूर नव्हतं. रात्री उशिरा आथिया आणि राहुल हॉटेल बाहेर आले. त्यावेळी आथियाच्या शर्टाची बटन्स उघडी होती.
लग्नानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले आणि KL-Athiya झाले ट्रोल
आथिया आणि राहुलचा लग्नानंतर पहिला व्हिडिओ समोर आलाय. यात दोघेही सीरियस मूडमध्ये दिसत होते. फोटोग्राफर्स सोबत बोलताना आथिया थोडी कठोर वाटली. तिच्या व्यवहाराशिवाय लूकसाठी सुद्धा आथियाला ट्रोल करण्यात येतय. अभिनेत्रीला पाहून अजिबात असं वाटत नाहीय, की तिचं लग्न झालय, अस कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी लिहिलय.
नेटीझन्सनी तिला सुनावलं
तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, आथियाच्या डोक्यात सिंदूर नाहीय. तिने गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घातलं नव्हतं. इतकच नाही, तिने जीन्स आणि टी-शर्ट परिधान केलं होतं. यात शर्टाच्या वरची आणि खालची काही बटन्स उघडी होती. आथियाचा लूक खूपच बोल्ड वाटला. त्यावरून नेटीझन्सनी तिला सुनावलं सुद्धा.
राहुल टेस्ट सीरीजच्या तयारीत व्यस्त
केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्या विवाहाची अजूनही चर्चा आहे. अजून या लग्नाच रिसेप्शन झालेलं नाही. मे महिन्यात आयपीएल संपल्यानंतर केएल राहुल आणि आथिया शेट्टीच्या लग्नाच रिसेप्शन होऊ शकतं. केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सीरीजची तयारी करतोय.